शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या जयघोषात पन्हाळगड प्रदक्षिणा

By admin | Updated: February 29, 2016 00:51 IST

गडसंवर्धनासाठी पन्हाळगड प्रदक्षिणा मोहीम उत्साहात झाली. सुमारे तीन हजार युवक-युवती या मोहिमेत सहभागी

पन्हाळा : छत्रपती शिवरायांसह त्यांच्या मावळ््यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिल रायडर्स अँड हायकर्स ग्रुपने आयोजित केलेली गडसंवर्धनासाठी पन्हाळगड प्रदक्षिणा मोहीम उत्साहात झाली. सुमारे तीन हजार युवक-युवती या मोहिमेत सहभागी झाले होते.‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’.. या घोषणांनी पन्हाळगड दुमदुमून गेला होता. वीर शिवा काशीद यांच्या समाधीस व पुतळ््यास वंदन करून मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, नगराध्यक्ष असीफ मोकाशी, ‘संजीवन’चे संस्थापक पी. आर. भोसले, एन. आर. भोसले, नगरसेवक विजय पाटील, डॉ. बी. आर. कोरे, राजू आगा, आदी मान्यवरांनी गड प्रदक्षिणेची सुरुवात चार दरवाजा येथून केली. ही प्रदक्षिणा चार दरवाजा, रेडेघाट, नरसुखिंड, तीन दरवाजा, गोपाळतीर्थ बाग, पुसाटी बुरूज, फुटकानंदी, तबक उद्यान, सज्जाकोटी, थोरात समाधी, नेबापूर, शिवा काशीद समाधी व परत चार दरवाजा अशी संपूर्ण गडच्या खालून प्रदक्षिणा पार पडली. प्रदक्षिणेस सुमारे पाच ते सहा तास वेळ लागला.गड प्रदक्षिणेसाठी संजीवन नॉलेज सिटीचे एक हजार विद्यार्थी, पन्हाळा विद्यामंदिरचे पाचशे विद्यार्थी, हिल रायडर्स ग्रुपचे एक हजार कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, इतिहासप्रेमी सहभागी झाले होते.आजच्या तरुणाईला गडकिल्ल्यांचा शौर्यशाली इतिहास कळावा, गडकोटाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, त्यांच्या अंगी साहस, चिकाटी, जिद्द निर्माण व्हावी यासाठी संजीवन पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सत्यजित काळभोर व हायकर्स ग्रुपच्या वतीने सागर बगाडे यांनी माहिती दिली. मोहिमेत सर्वांत लहान चार वर्षे वयाची वसुप्रिया आदित्य वेल्हाळ व ईश्वरी रामचंद्र चोबे यांनी भाग घेतला, तर ज्येष्ठ नागरिक विजय भोसले व डॉ. परांडेकर यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. गड प्रदक्षिणा मोहिमेत सहभागी सर्वांना पाणी व सरबत याची सोय संजीवन नॉलेज सिटीने केली होती. कार्यक्रमाची सांगता मयूर उद्यान येथे झाली. भाग घेतलेल्यांना जेवणासह प्रशस्तिपत्र देण्यात आले. (प्रतिनिधी)