शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पथकाच्या आढाव्यानंतर पन्हाळागडाला लवकरच मानांकन, लोकसहभाग महत्त्वाचा - जिल्हाधिकारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 18:55 IST

पन्हाळा: पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी येथील लोकसहभाग महत्त्वाचा असून नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोनातून मानांकनास सहकार्य करावे ...

पन्हाळा: पन्हाळागडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी येथील लोकसहभाग महत्त्वाचा असून नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोनातून मानांकनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. ५ आक्टोंबर रोजी पथक पन्हाळागडाला भेट देऊन आढाव घेणार असून या भेटीनंतर पन्हाळागडास मानांकन प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी पन्हाळगडावर  भेट देऊन पाहणी केली व त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना आराखड्याची माहिती देऊन येथील नागरीकांशी संवाद साधला. दरम्यान व्यावसायिकांवर अन्याय होवू देणार नाही अशी ग्वाही दिली.पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी येडगे यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळील तलावाला नैसर्गिकरीत्या बांधणीचे रुप देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन दरवाजा वास्तूची  पाहणी करून चर्चा केली, धर्मकोठी, बाजार पेठ, रेडेमहल यांची पाहणी करुन माहिती घेतली. संभाजी महाराजांच्या मंदिराला भेट देऊन इतिहास जाणून घेतला. राज्यातील अकरा गड किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी प्रस्ताव सादर झाले असून प्राथमिक स्वरूपात मानांकन प्राप्त हालचाली गतिमान झाल्या आहेत. या यादीत प्रामुख्याने पन्हाळागडाचा समावेश आहे.छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि जिजाऊ तसेच ताराराणी यांचा पदस्पर्शाने इतिहास लाभलेला पन्हाळागडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यावेळी जागतिक वारसा स्थळाच्या सुचनेनुसार लोकांना विशेष पेहरावा, व्यावसायिकांनाही ऐतिहासिक वास्तू पासून पन्नास ते शंभर मीटर अंतरातील अतिक्रमण हटविण्याची सुचनाही केली.यावेळी मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, पुरातत्व पन्हाळा विभागाचे संरक्षण सहाय्यक बाबासाहेब जंगले, विजय चव्हाण, अधीक्षक अमित माने, सार्वजनिक बांधकाम पन्हाळा विभाग अभियंता सचिन कुंभार, पोलीस अधिकारी संजय बोंबले, वन अधिकारी अनिल मोहीते, संग्राम भोसले, अमोल कोळी व रवींद्र धडेल आदी मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडcollectorजिल्हाधिकारी