शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमएसआरडीसी’कडून पंचनामा

By admin | Updated: March 13, 2015 23:57 IST

रस्ते विकास प्रकल्प : ‘आयआरबी’ला दणका; अपूर्ण कामे पूर्ण होणार

संतोष पाटील-कोल्हापूर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) मुख्य अभियंता पी. एन. ओहोळ यांनी ८ मार्चला कोल्हापुरातील सर्व रस्त्यांची पाहणी करून राज्य शासनाला अहवाल सादर केला. परिणामी गेल्या अडीच वर्षांत ‘आयआरबी’ने शहरातील ५० किलोमीटर रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसह अपूर्ण कामे केलेलीच नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यामुळेच रस्त्यावरील बंद पडलेले दिवे, गटर्स व चॅनेलची दुरुस्ती, अपूर्ण पदपथ, बसथांबे, रंकाळा येथे अ‍ॅम्पी थिएटर, आदी कामांना येत्या १५ दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. शहरातील रस्ते विकास प्रकरणी १० मार्चला विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने ओहोळ यांनी ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण रस्ते प्रकल्पाची पाहणी केली. रस्त्यांची देखभाल केलेली नाही. अनेक कामे अपूर्ण असल्याचे ओहोळ यांनी अहवालात नमूद केले. त्यांचा हा कोल्हापूर दौरा महापालिकेच्या, पर्यायाने शहरवासीयांच्या पथ्यावर पडला. गुरुवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत कधी नव्हे ती प्रथमच ‘एमएसआरडीसी’ने कोल्हापूर महापालिकेची बाजू घेतली. यापूर्वीच्या बैठकीत ‘आयआरबी’च्या बाजूने झुकते माप देणाऱ्या एमएसआरडीसीच्या धोरणात झालेल्या बदलांचा महापालिका अधिकाऱ्यांना धक्काच बसला. परिणामी, मासिक देखभालीच्या कामांसह अपूर्ण कामे करण्याचा दबाव ‘आयआरबी’वर वाढला आहे. येत्या पंधरा दिवसांत ही सर्व अपूर्ण कामे सुरू करावी लागणार आहेत. तसेच दर महिन्याला आयआरबी, महापालिका व एमएसआरडीसी यांच्यात होणाऱ्या सुकाणू समितीच्या बैठकीत केलेल्या कामांचा अहवाल सादर करावा लागणार आहे. पावसाळ्याच्या तोंडावर चॅनेल्स व गटारींची कामे पूर्ण करून घेण्याकडे महापालिका प्रशासनाचा कल आहे. त्या दृष्टीने ‘आयआरबी’ने प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांची यादी तयार केली आहे.शहरातील जलवाहिन्या रस्त्यांखाली दबल्या आहेत. गळती काढण्यासाठी आतापर्यंत महापालिकेने केलेल्या खुदाईपोटी ‘आयआरबी’ने अडीच कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, करारानुसार युटिलिटी शिफ्टिंग झालेले नाही. दर चारशे मीटरवर ठेवलेल्या डांबरी रस्त्यातून नवीन कनेक्शन घेणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नसल्याने हे पैसे कदापि न देण्याचा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला आहे.