शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा नदी घाट फेरप्रस्तावही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:36 IST

Panchganga River Kolhapur- पंचगंगा नदी घाट विकासाचे सुरू झालेल्या कामाच्याबाबतीत कोणाच्या तक्रारी होत्या माहिती नाही, परंतु हेरिटेज कमिटीच्या बैठकीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने काम थांबविण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी नागरी कृती समितीच्या सदस्यांना दिली. पुरातत्व विभागाकडे त्यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठविलेला फेरप्रस्तावदेखील प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंचगंगा नदी घाट फेरप्रस्तावही प्रलंबित परवानगी घेऊनही काम थांबविले : सोनवणे

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाट विकासाचे सुरू झालेल्या कामाच्याबाबतीत कोणाच्या तक्रारी होत्या माहिती नाही, परंतु हेरिटेज कमिटीच्या बैठकीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने काम थांबविण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी नागरी कृती समितीच्या सदस्यांना दिली. पुरातत्व विभागाकडे त्यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठविलेला फेरप्रस्तावदेखील प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.नदी घाट विकसित करण्याचे काम थांबविण्यात आले असून त्याची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कार्यकारी अभियंता सोनवणे, उपकार्यकारी अभियंता धनंजय भोसले, आर्किटेक्चर इंदजित नागेशकर यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चेत ही माहिती देण्यात आली.

नदी घाट परिसर छत्रपती ट्रस्टच्या मालकीचा असल्याने महाराजांची तसेच पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेताना हा परिसर ब्रम्हपुरी टेकडीपासून शंभर मीटर अंतराच्या बाहेर असल्याचे पटवून देऊनच कार्यवाही करण्यात आली. या ठिकाणी कोणतेही खुदाईचे काम होणार नव्हते. केवळ लँडस्केपिंग, पदपथासह दगडी भिंत घातली जाणार होती, असे नागेशकर यांनी सांगितले.हेरिटेज कमिटीची २ नोव्हेंबर २०१८ रोजी बैठक झाली. त्यामध्ये काही तक्रारी झाल्यानंतर नगररचना सहायक संचालकांनी २२ नोव्हेंबरला पत्र पाठवून काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच पुरातत्व विभागाच्या कोल्हापूर येथील विजय चव्हाण यांनी फोनवर काम थांबवा अन्यथा गुन्हे दाखल करू असे सांगितले. पण त्यांनी लेखी काहीच दिले नाही, असे धनंजय भोसले यांनी सांगितले. 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर