शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दीपोत्सवात उजळला पंचगंगा घाट, पणत्यांचे तेज : रांगोळीचा गालीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:22 IST

दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देदीपोत्सवात उजळला पंचगंगा घाटपणत्यांचे तेज : रांगोळीचा गालीचा

कोल्हापूर : पहाटेच्या निरव अंधाराला भेदून कोल्हापूरची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीघाटावर प्रज्वलित झालेल्या हजारो दिव्यांनी प्रकाशोत्सवाची सांगता झाली. दिव्यांचा झगमगाट, सुरेख रांगोळीचा गालीचा, प्रबोधनाची परंपरा, लेसर शो व गीतमैफल आणि नदीची विधीवत पूजा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवमुद्रा प्रतिष्ठान, संदीप देसाई सोशल फाउंडेशनच्या वतीने या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.वसुबारसने सुरू झालेल्या दिवाळीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. या दिवशी जलाशय तसेच मंदिरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाट म्हणजे नैसर्गिक, धार्मिक अधिष्ठान असलेले विलोभनीय ठिकाण. येथे पौर्णिमेच्या पहाटे होणारा दीपोत्सव म्हणजे अलौकिक सोहळा.

हा आविष्कार अनुभविण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी पहाटे सहकुटुंब हजेरी लावली. दीपोत्सवाची वेळ पहाटे चारची असली तरी त्याची तयारी सोमवारी रात्रीपासूनच सुरू झाली होती. विविध व्यक्ती, संस्था, संघटनांकडून नदीघाट परिसराला सजविण्यात येत होते. रंगावलीकार विविध विषयांनुरूप रांगोळी रेखाटण्यात गुंतले होते. कुणी संस्कारभारती, कुणी ठिपक्यांची, कुणी फुलांची, तर कुणी विशिष्ट थीमनुसार रंगावली साकारत होता.सजावटीची लगबग संपल्यानंतर पहाटे चार वाजता दीपोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी पंचगंगेची विधीवत पूजा झाली. ‘हर हर महादेव’च्या गजरात स्नानाचा सोहळाही सजला आणि दीपोत्सवाला प्रारंभ झाला. दरम्यान, घाटावरील पायऱ्या, समाधी मंदिरेही दिव्यांच्या मंद प्रकाशाने आणि विद्युत रोषणाईने झळाळून निघाली.

दिव्यांच्या प्रकाशासोबतच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ऐतिहासिक शिवाजी पुलावर लेसर शो लावण्यात आला होता. पहाटेच्या शांततेत हा दिव्यांच्या मंद प्र्रकाशाचा सोहळा साजरा होत होता.

घाटावरील ही मंदिरे, दीपमाळा आपलेच सजलेले रूप जणू पाण्यात प्रतिबिंबाच्या माध्यमातून पाहत होते. यावेळी नदीघाट परिसर नागरिकांनी फुलून गेला. अनेक महिला, मुली पणत्या घेऊन या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. उगवतीच्या सूर्याच्या साक्षीने सकाळी सातपर्यंत कोल्हापूरकरांचा हा उत्सव सहकुटुंब सुरू राहिला.या सुंदर सोहळ्याला गीतसंगीताची साथ लाभली. अंतरंग प्रस्तुत महेश हिरेमठ यांच्या मैफलीबरोबरच यंदा कराओके मैफलीचा आनंदही अनेक कोल्हापूरकरांनी घेतला. विविध संस्था, संघटनांतर्फे यावेळी दुधाचे वाटप झाले.

नगरसेवक संभाजी जाधव, पृथ्वीराज महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नेपोलियन सोनुले, आदींच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा सजला. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे दीपक देसाई, अक्षय मोरे, अवधूत कोळी, प्रवीण चौगले, अविनाश साळोखे, मयूर गवळी, अनिल शिंदे, ऋतुराज सरनोबत, आदींनी संयोजन केले.अखंड भारताचा नाराकलेच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा यंदाही दीपोत्सवात सुरू राहिली. यावेळी कलाकारांनी रांगोळीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या संस्कृतीची ओळख तर करून दिलीच; पण अयोध्येतील रामजन्मभूमी, अखंड भारत, मोबाईल व ड्रायव्हिंग एकाचवेळी नको, वाढती बेरोजगारी, छत्रपती शंभूराजेंची शिवपूजा, कचरा व्यवस्थापन, दिल का दरिया अशा विविध विषयांवर भाष्य केले. श्री अंबाबाई, गणरायाच्या विविध प्रतिकृती आणि फुलांची आरासही मन आकर्षून घेत होती.सेल्फी, फोटोसेशनया दीपोत्सवात कोल्हापूरकर सहकुटुंब सहभागी झाले होते. महिला व मुली पंचगंगेच्या काठावर उभे राहून पणत्यांसोबत आपली सेल्फी काढत होत्या. याशिवाय सजलेल्या सुरेख रांगोळ्या, आकाशाात फटाक्यांची आतषबाजी, दुसरीकडे लेसर शो आणि पणत्यांचा मंद प्रकाश आणि या सगळ्यांचे प्रतिबिंब उमटणारे पंचगंगेचे पात्र टिपण्यासाठी सगळ्यांचे मोबाईल सरसावले.

 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर