शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर पंचायत समितीकडील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव यांच्या आत्महत्येनंतर सलग दुसºया दिवशी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बाराही पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प राहिले. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. तुमच्या सर्वांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. मात्र त्यासाठी जनतेला वेठीस धरू ...

ठळक मुद्देबाराही पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर पंचायत समितीकडील कनिष्ठ सहायक बाळकृष्ण शंकर गुरव यांच्या आत्महत्येनंतर सलग दुसºया दिवशी मंगळवारी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील बाराही पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प राहिले. कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन निवेदन दिले. तुमच्या सर्वांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. मात्र त्यासाठी जनतेला वेठीस धरू नका, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाºयांनी कर्मचाºयांना केले आहे. गुरव यांनी रविवारी (दि. ३०) सकाळी विष पिऊन नदीत उडी टाकली होती. त्यांचा सोमवारी (दि. ३१) मृत्यू झाल्यानंतर वातावरण आणखी तणावपूर्ण झाले होते. सोमवारीच याबाबत पावसाळी अधिवेशनामध्येही चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी साडेदहानंतर कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर जमले. कर्मचाºयांनी पोर्चमध्येच ठिय्या मारला. सकाळी साडेदहाच्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार या ठिकाणी आले. त्यांनी आल्यानंतर या सर्व कर्मचाºयांशी संवाद साधला. डॉ. खेमनार म्हणाले, गेले तीन दिवस जिल्ह्यातील सर्व कामकाज बंद आहे. अधिवेशनामध्ये चर्चा झाल्याप्रमाणे याबाबतच्या चौकशीसाठीचे पत्र सकाळीच प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मोहिते यांचे निलंबनही मागे घेत असल्याचे डॉ. खेमनार यांनी जाहीर केले. संवाद साधून डॉ. खेमनार हे आपल्या दालनाकडे निघाल्यानंतर कर्मचारीही आत जाऊ लागले. यावेळी बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांत किरकोळ धक्काबुक्की झाली. यानंतर सर्व कर्मचाºयांनी राजर्षी शाहू सभागृहासमोर ठिय्या मारला. या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना अधिकाºयांवर टीकास्त्र सोडले. दुपारी पाऊणच्या सुमारास इंद्रजित देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, एस. एस. शिंदे, डॉ. एच. एच. श्ािंदे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे सर्वजण कर्मचाºयांसमोर आले. यावेळी देशमुख म्हणाले, आम्ही सर्वजण आपल्या भावना जाणतो. झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. मात्र आता दोन दिवसानंतर कामाला सुरुवात करण्याची गरज आहे. चौकशी सुरू झाली आहे. संबंधित अधिकाºयांना रजेवर पाठविले आहे. तरीही काम बंद ठेवून जनतेची सहानुभूती घालवून घेऊ नका. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले हे कर्मचाºयांना कामावर येण्यासाठी निरोप देत असल्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरीश्ंिसंह घाटगे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, पक्षप्रतोद विजय भोजे यांनीही कर्मचाºयांची भेट घेतली. त्यांनाही कर्मचाºयांनी निवेदन देऊन अधिकाºयांच्या निलंबनाची मागणी केली. यानंतर सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आपणही जिल्हा परिषदेमध्ये काम केले आहे. त्याहीवेळी जिल्हा परिषद अग्रेसरच होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाºयांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचे सांगत, यावेळी कर्मचाºयांनी आपली गाºहाणी सुभेदार यांना सांगितली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी सचिन जाधव, सचिन मगर, अजय शिंदे, अजित मगदूम, धनंजय जाधव, साताप्पा मोहिते, अतुल कारंडे, दत्तात्रय केळकर यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. .आजरा पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन सुरूचआजरा : करवीर पंचायत समितीमधील बाळकृष्ण गुरव यांच्या मृत्यूस उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा आजरा पंचायत समितीच्या विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी देत मंगळवारी, दुसºया दिवशी कामबंद आंदोलन केले. यामध्ये कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.शिरोळ पंचायत समिती कर्मचाºयांचे आंदोलनशिरोळ : शिरोळ पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी मंगळवारपासून बेमुदत सामुदायिक रजा आंदोलन सुरू केले आहे. पंचायत समितीच्या प्रांगणात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात येत आहे.येथील पंचायत समितीमधील गटविकास अधिकाºयाचे पद रिक्त आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे शिरोळ पंचायत समितीच्या शंभर कर्मचाºयांनी गटविकास अधिकारी यांच्या टेबलावर सामुदायिक रजेचे निवेदन देऊन आंदोलन सुरू केले आहे.भुदरगड पंचायत समितीच्या दारात ठिय्या आंदोलनगारगोटी : उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन चंद्रकांत वाघमारे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी आंदोलनाच्या दुसºया दिवशी भुदरगड तालुका पंचायत समिती कर्मचारी व तालुक्यातील ग्रामसेवक यांनी मंगळवारी दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बेमुदत रजेवर कर्मचारी गेल्याने ग्रामस्थांच्या कामाचा चांगलाच खोळंबा झाला. यामध्ये कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. शाहूवाडी पंचायत समितीमलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे पंचायत समितीमध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा झाली. पन्हाळा पंचायत समितीपन्हाळा : पन्हाळा पंचायत समितीच्या कार्यालयातील प्रागणांत सर्व कर्मचाºयांतर्फे बाळकृष्ण गुरव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलनात सहभागी कर्मचाºयांनी केली. कर्मचाºयांचे काम बंद आंदोलनामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.कुणाल खेमनार यांच्याकडून दिलगिरीजिल्हा परिषदेत आल्यानंतर कर्मचाºयांशी बोलताना डॉ. कुणाल खेमनार यांनी दिलगिरी व्यक्त केली. कुणालाही जाणीवपूर्वक काहीही अवमानकारक आपण बोललो नाही. मात्र यातूनही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, या शब्दांत खेमनार यांनी आपली भूमिका मांडली.चंद्रकांत दळवी यांची पुस्तके फाडून जाळलीविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ‘झिरो पेंडन्सी’ या विषयावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक जिल्हा परिषदेसमोर आणून कर्मचाºयांनी फाडले आणि जाळून टाकले. आचारसंहितेपूर्वी कामे करायला हवीतजिल्ह्यात २५ आॅगस्टनंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तत्पूर्वी आपल्या जिल्ह्यातील अनेक कामांची पूर्तता करायची आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेऊन कामावर हजर व्हा, असे आवाहन इंद्रजित देशमुख यांनी केले. कुलूप काढून टिळक, साठे यांना आदरांजली : कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे अधिकारी आणि पदाधिकाºयांची सोमवारपासून मोठी पंचाईत झाली आहे. गाडीच्या चालकापासून ते शिपायांपर्यंत सर्वजण आंदोलनात असल्याने अनेक अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ‘कॅफों’च्या दालनात बसून होते. अशातच समाजकल्याण समितीचे सभापती विशांत महापुरे, पक्षप्रतोद विजय भोजे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी सभापती दालनाचे कुलूप काढून तेथे लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन स्वत:च केले.