शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:17 IST

भरत शास्त्री ।लोकमत न्यूज नेटवर्कश्रवणबेळगोळ (कर्नाटक) : येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला. भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराज, १0८ वर्धमानसागर महाराज व पुष्पदंत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.महोत्सवात देशभरातील हजारो भाविकांनी कलशांचे सवाल घेऊन उपस्थिती लावली आहे. त्यामध्ये रविवारी एक हजाराहून अधिक भाविकांनी सकाळी ८.३०वाजता ...

भरत शास्त्री ।लोकमत न्यूज नेटवर्कश्रवणबेळगोळ (कर्नाटक) : येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवामध्ये रविवारी १00८ कलशांनी मस्तकाभिषेक करण्यात आला. भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महाराज, १0८ वर्धमानसागर महाराज व पुष्पदंत महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.महोत्सवात देशभरातील हजारो भाविकांनी कलशांचे सवाल घेऊन उपस्थिती लावली आहे. त्यामध्ये रविवारी एक हजाराहून अधिक भाविकांनी सकाळी ८.३०वाजता जलाभिषेक व त्यानंतर अखंड पंचामृत अभिषेक दुपारी दोन वाजेपर्यंत केला. त्यानंतर भाविकांना मूर्तीच्या दर्शनासाठी सोडण्यात आले. कलशधारकांच्या केशरी वस्त्रांनी संपूर्ण मंदिर परिसर केशरिया रंगात न्हाऊन गेला होता. अशाच प्रकारचा पंचामृत अभिषेक दि. २६ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर काही दिवस जलाभिषेकाने होत राहणार आहे. दरम्यान, चंद्रगिरी पर्वतावरील मंदिर व १0८ चिन्मयसागर महाराजांचे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सोहळ्यासाठी सरिता जैन, जिनेंद्र जैन, सतीशचंद जैन, सुरेश पाटील, विनोद दोड्डनावर, जयकुमार जैन, महावीर गंगवाल, प्रमोद जैन, राकेश सेठी प्रयत्न करीत आहेत.दान रक्कम लोकहिताच्या कामासाठी वापरण्यात येणार असल्याचे चारुकीर्ती महास्वामी यांनी सांगितले. स्वच्छतेचे काम सांगली, बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यांतील संघटना सन्मती संस्कार मंच यांचेकडे आहे.पंतप्रधान आज उपस्थित राहणारपंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी ११ वाजता येणार असून ते येथील २00 बेडच्या प्रशस्त रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर भगवान बाहुबली मूर्तीकडे पहाडावर जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पायºयांच्या तिसºया टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.