शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा काठी सेल्फीसाठी अतिउत्साहींचा ‘पूर’

By admin | Updated: July 14, 2016 00:38 IST

पोलिसांची डोकेदुखी : पूर पाहण्यासाठी शिवाजी पूल परिसरात भरली जत्रा; खबरदारीसाठी सौम्य लाठीमार

कोल्हापूर : पंचगंगा नदीसह कोल्हापूर-आंबेवाडी रस्त्यावरील पुराचे पाणी पाहण्यासाठी येणाऱ्या अनेक अतिउत्साही नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची डोकेदुखी बुधवारी वाढविली. पूर पाहण्यासाठी आलेल्या आबालवृद्धांमुळे दिवसभर शिवाजी पूल परिसरात जत्रा भरल्याचे चित्र होते. अनेकजण धोकादायक ‘सेल्फी’ काढण्यासाठी धडपडत होते. पावसाचा जोर कायम राहिल्याने कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर बुधवारी सकाळपासून पुराचे पाणी आले. शिवाय पंचगंगा नदीची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे पूरस्थिती पाहण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून नागरिक शिवाजी पूल परिसरात येऊ लागले. ब्रह्मपुरी आणि शाहूकालीन हौदाजवळील पुरातन मंदिर परिसरात नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी केली. त्यातच बाराच्या सुमारास रेडेडोहजवळून तीन मुले वाहून गेल्याचे समजताच आंबेवाडीकडे जाण्यासाठी युवक, नागरिकांची गर्दी वाढली. सुरक्षिततेच्या कारणावरून पोलिसांनी शिवाजी पुलाच्या चौकात लोखंडी अडथळे उभारून वाहतूक रोखली होती. या पुलावरून पुढे सोडण्यात येत नव्हते. पूर पाहण्यासह रेडेडोहाकडे जाण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांची गर्दी तासागणिक वाढू लागली. यातील काही अतिउत्साही नागरिकांची शिवाजी पुलावरून पुढे जाण्यासाठी धडपड सुरू होती. काहीजणांची येथूनच ‘सेल्फी’ टिपण्याची घाई सुरू होती. यातील काही अतिउत्साहींना पोलिसांनी सौम्य स्वरूपात लाठीचा प्रसादही दिला. सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिकांची गर्दी कायम होती. या परिसरात शहरातील विविध भागांतून दुचाकी, चारचाकी वाहनांसह आबालवृद्ध येऊ लागले. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीत व्यवसायाची संधी साधण्यासाठी गरम स्वीटकॉर्न, पेरू, आदी स्वरूपातील खाद्यपदार्थांची विक्री अनेक विक्रेत्यांकडून सुरू होती. पावसाच्या थंड हवेत गरमागरम स्वीटकॉर्नवर ताव मारत अनेकजण सहकुटूंब पुराचे दृश्य पाहत होते. (प्रतिनिधी) आम्ही आंबेवाडी, चिखलीचे आहोत ४पाण्याची पातळी वाढत असल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे पोलिस आंबेवाडीच्या दिशेने लोकांना सोडत नव्हते; पण काही युवक, नागरिक ‘आम्ही आंबेवाडी, चिखली, वडणगेचे ग्रामस्थ आहोत,’ असे सांगून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. ४यातील काहीजणांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. यातूनही जे पुढे गेले ते रस्त्यावरील पाणी पाहून मागे फिरत होते. पुराचे पाणी आलेल्या आंबेवाडी आणि बालिंगा पूल येथील रस्त्यांवरून काही युवक, नागरिक चालत ये-जा करीत होते. यांतील काही अतिउत्साही युवक परिस्थितीचे गांभीर्य समजून न घेता रस्त्यावरून वाहत्या पाण्यातच धोकादायकरीत्या ‘सेल्फी’ घेत होते.