शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवात रागदारी गायकीची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 16:53 IST

पं. विनोद डिग्रजकर व गायिका भारती वैशंपायन यांच्या रागदारी गायकीने कोल्हापूरकर रसिकांना स्वर संगीताची अनुभूती दिली. निमित्त होतं ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आयोजित पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं.

ठळक मुद्देरागदारी गायकीची अनुभूतीपं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सव

कोल्हापूर : पं. विनोद डिग्रजकर व गायिका भारती वैशंपायन यांच्या रागदारी गायकीने कोल्हापूरकर रसिकांना स्वर संगीताची अनुभूती दिली. निमित्त होतं ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम) आयोजित पं. सुधाकरबुवा डिग्रजकर स्मृती संगीत महोत्सवाचं.राम गणेश गडकरी हॉलमध्ये आयोजित या महोत्सवाच्या प्रथम सत्रात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांचे सुरेल गायन झाले. त्यांनी राग धनकोणी कल्याणने गायनाला सुरुवात केली. यात विलंबित एकतालातील ‘सरस सूर गावो’ ही बंदीश त्यांनी सादर केली. त्यानंतर ‘देख चंदा नभ निकासी आयो’ ही द्रुत तीन तालांतील बंदीश व मधुरंजनी रागातील मध्यलय झप तालातील ‘येरी सखी आज’ या बंदिशीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीतानंतर त्यांनी संत जनाबार्इंच्या अभंगाने आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना महेश देसाई (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम), योगेश रामदास व अतुल परीट (तानपुरा) यांनी साथसंगत केली.दुसऱ्या सत्रात भारती वैशंपायन यांनी राग बागेश्रीने मैफलीला सुरुवात केली. विलंबित तीन तालांतील ‘बिरहा ना जले’ या बंदिशीनंतर त्यांनी द्रुत तीन तालांतील ‘जारे जारे बिरहा’ ही बंदीश गायली. नायकी कनडा रागातील ‘मेरो पिया’ या बंदिशीनंतर ‘अब के सावन घर आजा’ ही ठुमरी त्यांनी सादर केली. राग भैरवीतील ‘प्रभू अजी कमला’ या रचनेने मैफलीची सांगता केली. त्यांना केदार वैशंपायन (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम), मधुरा वैशंपायन (तानपूरा) यांनी साथसंगत केली.नंदकुमार मराठे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. रामचंद्र टोपकर यांनी आभार मानले. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या को-आॅर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष नितीन वाडीकर, डॉ. उदय कुलकर्णी, अ‍ॅड. विवेक शुक्ल, गंधार डिग्रजकर, श्रीकांत लिमये, संतोष कोडोलीकर, रामचंद्र पुरोहित, सतीश कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :musicसंगीतkolhapurकोल्हापूर