शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

 कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळला, ठिकठिकाणी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:05 IST

जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात येत असून शिवसेनेने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर पाकिस्तानचा ध्वज जाळला.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यात पाक ध्वज जाळलाठिकठिकाणी निषेधाचे मोर्चे

कोल्हापूर :जम्मु-काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्या झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी निषेधाचे मोर्चे काढण्यात येत असून शिवसेनेने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर पाकिस्तानचा ध्वज जाळला.काल सायंकाळपासूनच नागरिकांचा संताप अनावर झाल्याचे चित्र पहावयास मिळत होेते. सकाळपासून अनेक गावांमध्ये पाकिस्तानचा पुतळा,ध्वज जाळण्यापासून ते शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. तालुका पातळीवरही अनेक ठिकाणी या हल्ल्याचा तीव्र निषेध होत असून आता भारताने पाकिस्तानला अ्ददल घडवावी असा सूर व्यक्त होत आहे.कोल्हापुरात सकाळी जनशक्तीच्यावतीने बिंदू चौकामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यानंतर मिरजकर तिकटीवर शिवबांचा मावळा संघटनेच्यावतीने पाकिस्तानचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी जय भवानी, जय शिवाजी घोषणांनी चौक दुमदुमून गेला.यानंतर शिवसेनेच्यावतीने पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे संचालक शिवाजीराव जाधव, सुजित चव्हाण, सुभाष वोरा, समीर नदाफ, आदिल फरास, ईश्वर परमार, अमोल माने, विनोद जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूर