मंगळवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह कोल्हापूर शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यातच एसएससी बोर्डनजीक वीज इलेक्ट्रिक ट्रान्सफाॅर्मरवर कोसळली,; त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याची बातमी व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकाने तेथे धाव घेतली; पण एसएससी बोर्डनजीक ‘लाईफस्टाईल’ या अपार्टमेंटशेजारी नाल्यात वीज कोसळली असावी. तेथे मोठा प्रकाश पडून आवाज झाल्याचे परिसरातील नागरीरिकांनी सांगितले. वीज कोसळल्यामुळे परिसरात कोणतेही नुकसान अथवा जळीत झाल्याची घटना घडली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रतिभानगरचे स्टेशनमास्तर जयवंत खोत यांनी सांगितले. दरम्यान, या परिसरात वीज कोसळण्यापूर्वीच सोसाट्याचा वारा सुटल्याने प्रतिभानगर परिसरातील ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युतवाहिनीमध्ये दोष निर्माण झाला होता, तिच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. कोणत्याही इलेक्ट्रिक ट्रान्सफाॅर्मरवर वीज कोसळलेली नाही, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी दिली.
जोड... ट्रान्सफार्मरवर नव्हे, नाल्यात वीज कोसळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:41 IST