शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कलागुणांच्या उधळणीत रंगली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:27 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : डोलायला लावणारी लोकनृत्यं, अत्याधुनिक संगीत साधनांच्या साथीने रंगलेले पाश्चिमात्य गायन, सूरमयी सफर घडविणारे शास्त्रीय सूरवाद्य, भारतीय गायन परंपरेची झलक घडविणारे समूहगायन, अशा विविध कलागुणांच्या उधळणीत शिवाजी विद्यापीठाच्या ३७ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात मंगळवारी तरुणाई रंगली. सायंकाळी सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याने लोकनृत्याचा प्रारंभ ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : डोलायला लावणारी लोकनृत्यं, अत्याधुनिक संगीत साधनांच्या साथीने रंगलेले पाश्चिमात्य गायन, सूरमयी सफर घडविणारे शास्त्रीय सूरवाद्य, भारतीय गायन परंपरेची झलक घडविणारे समूहगायन, अशा विविध कलागुणांच्या उधळणीत शिवाजी विद्यापीठाच्या ३७ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवात मंगळवारी तरुणाई रंगली. सायंकाळी सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाल्याने लोकनृत्याचा प्रारंभ लांबला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती.गारगोटी (ता. भुदरगड) येथील श्री मौनी विद्यापीठाच्या प्रागंणात स्पर्धक, साथीदार, समर्थक, अशा विविध भूमिकांतून युवक-युवतींनी महोत्सवाचा आनंद लुटला. महात्मा फुले सदनातील सुगम गायन आणि ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील शास्त्रीय नृत्याने महोत्सवातील दुसºया दिवसाची सुरुवात झाली.डॉ. व्ही. टी. पाटील मुख्य व्यासपीठावर सकाळी साडेअकराच्या सुमारास पाश्चिमात्य एकलगीत गायन सुरू झाले. यातील स्पर्धकांनी उपस्थितांना ताल धरायला लावला. रात्री देशाच्या कला-सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारी बहारदार लोकनृत्ये सादर झाली.उत्सवाच्या नव्या रूपाचे दर्शनटी. व्ही. आणि चित्रपटाव्यतिरिक्त मनोरंजनाच्या इतर साधनांचा संपर्क गारगोटीमध्ये कमी आहे. मात्र, या मध्यवर्ती महोत्सवाच्या माध्यमातून येथील नागरिकांना प्रत्यक्ष एकांकिका, लघुनाटिकांमधील अभिनय, नृत्य, गीत-संगीताची अनुभूती घेता आली. त्यांना या उत्सवाच्या नव्या रूपाचे दर्शन घडले.‘सेल्फी’चा मोहविविध गावे, शहरांतून आलेले युवक-युवती महोत्सवात रममाण झाले आहेत. आपल्या संघाबरोबरच नव्या मित्र-मैत्रिणींसमवेत अनेकांच्या गप्पा रंगल्या होत्या. निसर्गरम्य परिसरातील मौनी विद्यापीठाच्या आवारात ‘सेल्फी’ घेण्याचा मोह अनेक युवक-युवतींना आवरता आला नाही. सेल्फी घेतल्यानंतर तो लगेचच आपल्या फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या प्रोफाईलवर अनेकांनी झळकविला. स्पर्धेत सहभागी असलेल्या तरुणाईचा मिळेल त्याठिकाणी सराव सुरू होता.आज समारोपकलाविष्काराचा जागर असणाºया या महोत्सवाचा आज, बुधवारी दुपारी दोन वाजता श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.