शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

रंकाळ्याचे दुखणे कायम

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

ठोस उपाययोजना नाहीत : सांडपाणी रोखण्यात यश; पण तटबंदीचे ढासळणे सुरूच

संतोष पाटील - कोल्हापूर - राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून रंकाळा प्रदूषणमुक्तीसाठी पहिल्या टप्प्यात ८.६६ कोटींचा निधी आला. त्यातील बहुतांश कामे अपूर्ण असताना दुसऱ्या टप्प्यातील १०० कोटींच्या निधीचे वेध महापालिकेला लागले आहेत. मुंबईतील एन.जे.एस. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रंकाळा परिसराची पाहणी करून आवश्यक कामांची यादीही तयार केली. केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी ठोस उपाय योजण्याची केलेली घोषणा हवेतच विरली. निधी व घोषणांचा पाऊस पडत असताना रंकाळ्याची दुर्दशा मात्र आहे तशीच आहे.संवर्धन योजनेतून पहिल्या टप्प्यात रंकाळ्यासाठी आलेल्या निधीतून साडेचार कोटी रुपयांची तांबट कमान ते रंकाळा टॉवर पाईपलाईन टाकण्याचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. निसर्गकेंद्र प्राथमिक अवस्थेत आहे. गाळ काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली गेली नाही. रंकाळ्यात शाम सोसायटी, देशमुख कॉलनी, सरनाईक कॉलनी, आदी नाल्यांतून मिसळणारे सांडपाणी पंधरा दिवसांपूर्वी रोखण्यात महापालिकेला यश आले आहे. अद्याप दीड ते दोन एमएलडी सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ काढणे, निर्माल्य कुंडाचे बांधकाम, ओव्हरफ्लो कमान, आदी कामे वगळता एकही भरीव काम पहिल्या टप्प्यात झालेले नाही. साडेआठ कोटी रुपये खर्च करूनही रंकाळ्याच्या दुखण्यात कणभरही फरक पडलेला नाही. सांडपाणी बंद झाल्याचे दृश्य परिणाम समोर येण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ड्रेनेज लाईन टाकणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे किंवा स्थूल ठेवण्यासाठी उपाययोजना, निर्गत पाण्याच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती, पदपथ, सांडपाणी पूर्णपणे रोखणे, आदींसाठी राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून तब्बल १०० कोटींचा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामास सुरू होईल तेव्हा होईल. मात्र, सध्या रंकाळ्याला आलेली अवकळा शहरवासीयांना व्यथित करणारी आहे.