शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शाहू स्टेडियमसाठी पेठा एकवटल्या; आज बैठक--‘केएसए’चे जिल्हाधिकाºयांकडे अपील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:34 IST

कोल्हापूरची ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखला जाणारा शाहू स्टेडियम शासनाने ताब्यात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी, तर मंगळवार पेठेतील सर्व फुटबॉल मंडळे

ठळक मुद्देफुटबॉल : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर होणार चर्चा

कोल्हापूर : कोल्हापूरचीफुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखला जाणारा शाहू स्टेडियम शासनाने ताब्यात घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिवाजी पेठेतील सर्व तालीम मंडळे, शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी, तर मंगळवार पेठेतील सर्व फुटबॉल मंडळे, तालीम संस्था मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात दुपारी चार वाजता एकवटणार आहेत.

कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या अधिपत्याखाली असलेले व ‘पश्चिम महाराष्ट्राची फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळख असणारे ‘छत्रपती शाहू स्टेडियम’ सरकारजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले आहेत. शासनाच्या आदेशामुळे कोल्हापूरचा फुटबॉल खेळ थांबणार आहे. त्यातून खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तरी हा निर्णय मागे घ्यावा. याकरिता पुढील रणनिती ठरविण्यासाठी व कृती करण्यासाठी तालीम संस्था, पेठा, तरुण मंडळे, फुटबॉलच संघ व सर्व क्रीडा प्रेमींची बैठक शिवाजी मंदिरात आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. असे पत्रक शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी काढले आहे.

मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, सुबराव गवळी तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, कै. अनिल मंडलिक स्पोर्टिंग, शिवस्मृती तरुण मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, न्यू बिनधास्त कला व क्रीडा मंडळ, जंगी हुसेन तालीम मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, नंगीवली तालीम मंडळ, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, तुकाराम माळी तालीम मंडळ, आदी मंडळाचे कार्यकर्ते दुपारी चार वाजता मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात एकत्रित येणार आहेत. याबाबतचे पत्रक श्रीनिवास साळोखे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.‘केएसए’चे जिल्हाधिकाºयांकडे अपीलशाहू स्टेडियम वाद : दोन दिवसांत बैठक; स्पर्धांचे भवितव्य अंधारातकोल्हापूर : येथील छत्रपती शाहू स्टेडियमसह कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची (के. एस. ए.) मिळकत सरकारजमा करण्याच्या निर्णयाचे पत्र मिळताच त्याविरुद्ध के. एस. ए.ने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे अपील दाखल केले आहे.

निर्णय घेत असताना संस्थेचे म्हणणे मांडण्यास पुरेपूर संधी दिली नाही; हा एकतर्फी तसेच अन्यायकारक निर्णय असल्याने त्याची फेरसुनावणी घ्यावी आणि आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी अपिलामध्ये केली आहे. जर जिल्हाधिकाºयांकडून न्याय मिळाला नाही तर त्यांच्याविरुद्ध सक्षम यंत्रणेकडे दाद मागण्याचाही पवित्रा के. एस. ए.ने घेतला आहे.दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी घेतलेल्या निर्णयामुळे व्यथित झालेले के. एस. ए.चे पदाधिकारी तसेच कार्यकारिणीची बैठक माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसांत होणार असून , त्यामध्ये पुढील दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाने शाहू स्टेडियम सरकारजमा करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात खेळाडू व क्रीडारसिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामातील ‘के. एस. ए. लीग’ ही मानाची फुटबॉल स्पर्धा पार पडली आहे; तर अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (दि. २७) होणार आहे. त्यानंतर राजेश चषक, महापौर चषक, सतेज चषक, अटल (नेताजी) चषक, फुटबॉल महासंग्राम अशा अनेक स्पर्धा होणार आहेत. स्टेडियमच सरकारजमा झाल्याने या स्पर्धांचे भवितव्य अंधारात आले आहे. शाहू छत्रपती यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या क्रीडाप्रेमींच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने फुटबॉलसह अन्य खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम के.एस.ए.ने सुरू ठेवले असताना, अचानकपणे शाहू स्टेडियम सरकारजमा करण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांनी घेतल्यामुळे कोल्हापूर नगरीतील तमाम क्रीडारसिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जिल्हाधिकाºयांकडे दाखल झालेल्या तक्रारीमागे राजकारण लपले असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी त्यावर ठोसपणे कोणी बोलण्यास तयार नाहीत. ज्या दिवशी जिल्हाधिकारी निर्णय घेतात आणि त्याच्या दुसºयाच दिवशी शाहू स्टेडियमच्या जागेवर सरकारचे नाव लागते, एवढी तत्परता दाखविली गेल्यामुळे त्याला राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. शाहू स्टेडीयम हे केएसएच्या ताब्यात राहीले पाहीजे अशी आपली भुमिका असल्याचे ताराराणी आघाडीचे नेते सत्यजित कदम यांनी म्हंटले आहे.

अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टेडियम ताब्यात घेण्यासंबंधी लेखी आदेश आलेले नाहीत. अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना के. एस. ए.च्या अधिपत्याखाली होईल. - चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी,शिवाजी स्टेडियमसाठी निधी नाहीशिवाजी स्टेडियम हे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अधिपत्याखाली आहे. मात्र, त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यात शाहू स्टेडियम जर कार्यालयाच्या ताब्यात दिले तर काय होईल, असा सवाल विचारला जात आहे.सुनावणी कधी झाली?शाहू स्टेडियमच्या जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाल्याचे आम्हाला काही दिवसांपूर्वी निर्णयाची प्रत हातात पडल्यावर कळले. मंडल निरीक्षकाने काही कागदपत्रांची आमच्याकडे मागणी केली होती, आम्ही ती त्यांच्याकडे सादर केली; पण तक्रारीवर सुनावणीला आम्हाला कोणी बोलविले नाही. एकतर्फी निर्णय झाल्यामुळे आम्ही लागलीच उद्या, शुक्रवारी जिल्हाधिकाºयांकडे अपील दाखल केले आहे, असे ‘के. एस. ए.’चे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी सांगितले.

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी