शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता पगारी पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 15:36 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ संघर्ष समितीसह कोल्हापूरकरांची आक्रमकता आणि स्थानिक आमदारांनी विधानसभेत उठवलेला आवाज यामुळे शासनातर्फे विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी तीन महिन्यात अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल शासनाला जाण्याआधीच हा निर्णय झाल्याने श्री अंबाबाईला घागरा-चोली नेसवण्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूरात सुरु असलेल्या आंदोलनाला ़अन्य देवस्थानांच्या तुलनेत लवकर यश आले.

ठळक मुद्देतीन महिन्यात कायदा : रणजित पाटीलआमदारांच्या लक्षवेधीवर सरकारचा निर्णय अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनाला यश जिल्हाधिकाºयांच्या अहवालापूर्वीच निर्णय

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाओ संघर्ष समितीसह कोल्हापूरकरांची आक्रमकता आणि स्थानिक आमदारांनी विधानसभेत उठवलेला आवाज यामुळे शासनातर्फे विधी व न्यायमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी तीन महिन्यात अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल शासनाला जाण्याआधीच हा निर्णय झाल्याने श्री अंबाबाईला घागरा-चोली नेसवण्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूरात सुरु असलेल्या आंदोलनाला ़अन्य देवस्थानांच्या तुलनेत लवकर यश आले.

श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी ९ जून रोजी अंबाबाई मूर्तीला घागरा चोली नेसवल्यापासून श्रीपूजक विरोधी आंदोलनाला सुरवात झाली. स्थानिक नागरिकांनी दोन दिवसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ठाणेकरांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबत्त गुन्हा नोंद केला. तसेच श्रीपूजकांना सदबुद्धी हे असे साकडेच अंबाबाईला घातले. धर्मतत्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकूमाचा संदर्भ देत पुजारी हे सरकारी नोकर आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वटहुकूमाला तथाकथित म्हणून संबोधण्याची चूक श्रीपूजकांना भोवली आणि अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ मागणीचे आंदोलन पेटले.श्रीपूजकांकडून गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये केल्या गेलेल्या चुका, गुन्हे, अंबाबाईच्या नावाने येणारी बेहिशोबी संपत्ती, देवस्थान समितीच्या कामातील अडथळे, प्रधानांची संपलेली वहिवाटी अशा अनेक बाबी गेल्या दोन महिन्यात प्रकाशात आल्या आणि आंदोलनाला पुराव्यानिशी अधिक बळ मिळाले.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण झाल्यानंतर या विषयावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणी प्रक्रिया सुरु झाली. देवस्थान समितीनेदेखील सुनावणीत पगारी पूजारी नेमण्याची मागणी केली. त्याविरोधातही श्रीपूजक न्यायालयात गेल्याने त्यांच्याविरोधात रोष अधिक वाढला होता. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना त्यांचा अहवाल शासनाला पाठवण्यासाठी तीन महिन्यांचा म्हणजेच २२ सप्टेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यांच्याकडून अहवाल बनवण्याचे काम सुरु आहे.दरम्यान प्रश्नाचे महत्व जाणून सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातच याबाबत निर्णय व्हावा यासाठी स्थानिक आमदार आग्रही असल्याने त्यांनी लक्षवेधीची मागणी केली आणि गुरुवारी झालेल्या चर्चेअंत न्याय व विधी खात्याचे मंत्री रणजित पाटील यांना अंबाबाई मंदिरात पगारी पूजारी नेमण्यासाठी तीन महिन्यात कायदा करणार असल्याचे जाहीर करावे लागले.

घटनाक्रम९ जून : अंबाबाईला घागरा चोली परिधान.११ जून : नागरिकांकड़ून जूना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दारात आंदोलन व श्रीपूजकांवर गुन्हा नोंद.१४ जून : श्रीपूजक- नागरिक समन्वय बैठकीची मागणी१५ जून : समन्वय बैठकीला श्रीपूजकांचा नकार१६ जून : शााहू महाराजांच्या वटहूकूमानुसार पूजारी सरकारी नोकर : डॉ। सुभाष देसाई१६ जून : शाहू महाराजांच्या वटहूकूमाचा तथाकथित म्हणून अवमान१७ जून : अंबाबाई मंदिर पूजारी हटाओ मागणी संदर्भात बैठक१८ जून : अंबाबाईला साकडे२१ जून : जिल्हाधिकाºयांना निवेदन२२ जून : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठक, श्रीपूजक अजित ठाणेकर यांना मारहाण२२ जून : पूजारी हटाओ मागणीवर निर्णयासाठी जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणीचा निर्णय२३ जून : ठाणेकर पितापूत्रांना अंबाबाई मंदिर प्रवेश बंदी : जिल्हा-पोलीस प्रशाासनाचा निर्णय२५ जून : महालक्ष्मी एक्सप्रेसचे अंबाबाई एक्सप्रेस नामांतर२५ जून : अजित ठाणेकर यांचा माफीनामा२८ जून : संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांना धमकीचे पत्र३ जूलै : पूजारी हटाओचा जिल्हा परिषदेचा ठराव५ जूलै : पूजारी हटाओसंबंधी पहिली सुनावणी संघर्ष समितीकडून दोन हजार पानी पूरावे१९ जूलै : श्रीपूजकांचे म्हणणे सादर२० जूलै : महापालिकेत पूजारी हटाओ ठराव मंजूर२० जूलै : देवस्थान समितीचे म्हणणे सादर२२ जूलै : सुनावणी प्रक्रिया विरोधात श्रीपूजक गजानन मुनिश्वर न्यायालयात२५ जूलै : न्यायालयात संघर्ष समितीचाही दावा१ आॅगस्ट : आमदार राजेश क्षिरसागर यांच्याकडून लक्षवेधी प्रश्नासंबंधी बैठक७ आॅगस्ट : न्यायालयीन प्रक्रियेत देवस्थान समिती त्रयस्थ पक्षकार म्हणून दाखल