शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:37 IST

पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले

मुंबई : पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.या मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचे विधानसभा विधेयक संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत मांडले होते.बुधवारी त्यावर चर्चा होऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले.या पगारी पुजाऱ्यांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असतील अशी तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे. .छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू वैदिक स्कूलला मंदिर व्यवस्थापन समिती पूर्ण मदत करणार आहे.श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर विश्वस्त व्यवस्था,कोल्हापूर अशी विश्वस्त व्यवस्थाही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहात दिली.आज मंजूर झालेल्या विधेयकानुसार आता पगारी पुजारी नेमण्यात येतील.पूजा करणाºया व्यक्तींचे अनुवांशिक,संविदाकृत अधिकार नाहीसे होणार आहेत. मात्र असे वंशपरंपरागत अधिकार संपुष्टात आलेल्या व्यक्तीला ९० दिवसांत भरपाईच्या रकमेसाठी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करता येईल.नुकसानभरपाईसाठीचे सरासरी उत्पन्न हे नियमाच्या दिनांकापुर्वीच्या मागील दहा वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारे निर्धारित करण्यात येणार आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या जमिनींसंदर्भात फॉरेन्सिक अंकेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.रणजित पाटील यांनी दिली.मंदिर विश्वस्त व्यवस्थापन समितीमंदिर विश्वस्त व्यवस्थेचे व्यवस्थापन करण्यासाठी श्री अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे.या समितीत एकूण आठ सदस्य असतील. कोल्हापूरचे महापौर हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.क्षीरसागर यांच्या सूचनाशिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडले. पंढरपूर येथे रूख्मिणी मातेची पूजा महिला पुजा-यांकडून केली जाते.अंबाबाई देखील मातृदेवता असल्याने तिचीही पूजा महिला पुजाºयांकडून करण्यात यावी.तसेच छत्रपती शाहू महाराजांनी पूजाविधी स्कूलची स्थापना केली होती.या शाळेतून पुजाºयांची नेमणूक करण्यात यावी.पुजाºयांनी आतापर्यंत कोटयवधी रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्याची गरज नाही आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील जमिनीबाबत मी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.मुख्यमंत्रयांनी त्याची एसआयटी चौकशीही घोषित केली होती त्याचे काय झाले असा प्रश्नही क्षीरसागर यांनी विचारला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सर्व हिंदूंच्या मंदिरांमध्ये पुजारी नेमताना काही अटी शर्ती ठेवाव्यात व परीक्षा घेउन त्यांची नेमणूक करण्यात यावी व सर्व जातींच्या व्यक्तींना पुजारी होण्याची मुभा असावी अशी सूचना केली.