शाहूपुरी जिमखाना मैदानावर बुधवारी झालेल्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना पॅकर्स क्रिकेट क्लबने ४० षटकांत ७ बाद २०७ धावा केल्या. त्यात जुनेद मलबारी नाबाद ६६, नीलेश धुमाळ ४६, अनिमेश राय ३५, महादेव पवार नाबाद १७ धावा केल्या. गोलंदाजी करताना शाहूपुरी संघाकडून पार्थ नागेशकरने ४, श्रेयस देसाई, दिवाकर पाटील, शिवम कदम यांनी प्रत्येक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी संघाने हे आव्हान २९.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावा करत विजय संपादन केला. त्यात अभिजीत देशपांडेने ८१, अक्षय पवार नाबाद ४१, अविनाश कांबळे नाबाद २८, मेहुल बुकशेटने नाबाद २१ धावा केल्या. शिवम कदमने १६ धावा केल्या. ‘पॅकर्स’कडून सुरेंद्र पाठक, शिवेंद्र पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
‘शाहूपुरी’ची पॅकर्स ‘ब’वर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST