अमृता सध्या ‘केआयटी’च्या संगणकशास्त्र विभागामध्ये (अंतिम वर्ष) शिकत आहे. तिच्या निवडीचे पत्र ॲडोब कंपनीकडून तिला नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती ‘केआयटी’चे अध्यक्ष सुनील कुलकर्णी आणि ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार यांनी दिली. याबद्दल ‘केआयटी’च्यावतीने तिचा आणि तिच्या पालकांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. मनोज मुजुमदार, विभागप्रमुख डॉ. ममता कलस, प्लेसमेंट अधिकारी डॉ. अमित सरकार उपस्थित होते.
चौकट
अशी झाली निवड
ॲडोब कंपनीने ‘सी कोडिंग’ स्पर्धा घेतली होती. त्याद्वारे अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली. यासाठी तिला दरमहा एक लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली. या इंटर्नशिपदरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने दाखविलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून कंपनीने तिला ही खास ‘प्री-प्लेसमेंट’ची ऑफर दिली. अभियांत्रिकी शिक्षणासाठी तिचा झालेला सर्व खर्च म्हणून दहा लाखांचा लर्निंग फंड कंपनी देणार आहे.
प्रतिक्रिया
या कंपनीत निवड झाल्याचा खूप आनंद होत आहे. भाविष्यामध्ये आपल्या देशाच्या आयटी आणि संगणकशास्त्र क्षेत्रामध्ये नवनिर्मितीचे योगदान देण्याचे माझे स्वप्न आहे.
-अमृता कारंडे
चौकट
अभिमानास्पद निवड
माझ्या मुलीने गुणवत्ता आणि कष्टाच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तिची निवड होणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याचे श्रेय अमृतासह तिची आई, शिक्षक आणि महाविद्यालयाचे असल्याची प्रतिक्रिया विजयकुमार कारंडे यांनी व्यक्त केली.
फोटो (२६०८२०२१-कोल-अमृता कारंडे (केआयटी) : कोल्हापुरात गुरुवारी ॲडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरपदी निवड झाल्याबद्दल अमृता कारंडे हिचा सत्कार केआयटी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी मनोज मुजुमदार, ममता कलस, अमित सरकार, अजित पाटील, आदी उपस्थित होते.
260821\26kol_11_26082021_5.jpg
फोटो (२६०८२०२१-कोल-अमृता कारंडे (केआयटी) : कोल्हापुरात गुरूवारी ॲडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरपदी निवड झाल्याबद्दल अमृता कारंडे हिचा सत्कार केआयटी महाविद्यालयाचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी मनोज मुजुमदार, ममता कलस, अमित सरकार, अजित पाटील, आदी उपस्थित होते.