शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्याप्रकरणातील संशयित अमित दिगवेकरला २३ पर्यंत पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 15:49 IST

ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आठवा संशयित अमित रामचंद्र दिगवेकर (वय ३८, रा. कळणे ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग ) याला मंगळवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांनी २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर न्यायालयात हजर : वीरेंद्र तावडेअकोलकरच्या संपर्कात असल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आठवा संशयित अमित रामचंद्र दिगवेकर (वय ३८, रा. कळणे ता. दोडामार्ग ,जि. सिंधुदुर्ग ) याला मंगळवारी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांनी २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.बंगळूर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बंगळूर एसआयटीने संशयित अमित दिगवेकरला अटक केली होती. दरम्यान, गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास कोल्हापूर एसआयटी करीत आहे. या प्रकरणात त्याचे नाव पुढे आले. त्यामुळे त्याचा ताबा सोमवारी (दि. १४) बंगळूर न्यायालयाकडून कोल्हापूर एसआयटीने घेतला.

पानसरे हत्याप्रकरणी दिगवेकरला मंगळवारी सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. तो या प्रकरणातील आठवा संशयित आहे. त्याला कोल्हापूर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी.जी.सोनी यांच्या न्यायालयात हजर केले.सरकारपक्षातर्फे सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. शिवाजी राणे व संशयित आरोपीतर्फे अ‍ॅड. समीर पटवर्धन व अ‍ॅड. स्मिता शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी अ‍ॅड. राणे यांनी, दिगवेकर हा पानसरे हत्या प्रकरणातील दोन नंबरचा संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात असायचा.

त्याने बेळगांव येथे बॉम्बस्फोट व गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या तावडेबरोबर बैठकाही व्हायच्या. याचबरोबर तो या प्रकरणात फरारी असलेल्या पुणे येथील सारंग अकोलकर याच्या संपर्कात होता. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे दिगवेकरला १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली.अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले, पानसरे हत्या प्रकरणात यापुर्वी संशयित अमोल काळे, भरत कुरणे व वासुदेव सुर्यवंशीला या तिघाना या गुन्हयात वापरलेली दूचाकी व पिस्तुलप्रकरणी तपास यंत्रणेने अटक केली होती.

आताही हेच कारण सांगून अमित दिगवेकरला त्यांनी अटक केली आहे. त्यामुळे त्याला तीन दिवस पोलिस कोठडी द्यावी व भेटण्यासाठी सायंकाळी पाच ते सहा अशी एक तास परवानगी मिळावी. दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून जी.जी. सोनी यांनी दिगवेकरला २३ पर्यंत पोलिस कोठडी दिली. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूरCourtन्यायालय