शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
6
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
7
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
8
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
9
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
10
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
11
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
12
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
13
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
14
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
15
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
16
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
17
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
18
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
19
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
20
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश

पी. एन., के. पी., ए. वाय. आज एकत्र

By admin | Updated: December 30, 2014 00:16 IST

जिल्ह्याचे लक्ष : आर. सी. पाटील यांच्या सत्काराचे निमित्त; शाहू स्मारकमध्ये कार्यक्रम

शिरगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त उद्या, मंगळवारी दुपारी तीन वाजता दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये होणाऱ्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष के. पी. पाटील व एस. टी. महामंडळाचे संचालक व राष्ट्रवादीचे राधानगरी तालुक्याचे नेते ए. वाय. पाटील हे एकाच व्यासपीठावर येत असल्याने जिल्ह्याचे लक्ष या सत्कार समारंभाकडे लागले आहे.विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते ए. वाय. पाटील यांनी एका कार्यक्रमात करवीरचे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्या कार्याची प्रशंसा केल्याने नाराज झालेल्या माजी आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावती व बिद्री परिसरातील कॉँग्रेसच्या नेतेमंडळींना एकत्र केले. त्यांच्या मदतीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांना पराभूत केले. पी. एन. पाटील यांच्या ताकदीचा अंदाज न आल्याने व राधानगरी- भुदरगड मतदारसंघात बदलाचे वारे झाल्याने के. पी. यांचा ३९ हजार मतांनी पराभव झाला. इकडे करवीर मतदारसंघातही पी. एन. पाटील यांचा शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. दोन्ही मतदारसंघात दोन्हीही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना शिवसेनेच्या उमेदवारांनी पराभूत केले. राजकारणात कोण कोणाचा कायमचा राजकीय शत्रू वा मित्र नसतो. आता भोगावती व दूधगंगा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात माजी आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील व एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील हे व्यासपीठावर विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या सत्काराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.