शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘पी. एन.-चंद्रकांतदादा’ युतीचे गौडबंगाल काय?

By admin | Updated: May 22, 2015 00:55 IST

दादा सज्जन आणि सरळ

कोल्हापूर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हाडवैर असताना कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व पी. एन. पाटील यांच्यात युती कशी; यामागील गौडबंगाल काय, अशी विचारणा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसवर पालकमंत्र्यांचा एवढा राग का? याबाबत त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार मुश्रीफ म्हणाले, काही करून राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायाने हसन मुश्रीफ यांना जिल्हा बँकेचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही. यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फिल्डिंग लावली होती. त्यांनी काही संचालकांना फोन करून माझ्या विरोधात जाऊन पी. एन. पाटील यांना साथ देण्यास सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटते, नेमके आमचे काय चुकले हेच कळत नाही. केंद्रात नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्या संघर्ष सुरू असताना कोल्हापुरात चंद्रकांतदादा पाटील व पी. एन. पाटील यांची युती कशी? राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ नये, याची चंद्रकांतदादांना काळजी का? असा सवालही त्यांनी केला.दादा सज्जन आणि सरळजिल्हा बँकेच्या माजी संचालकांची ‘कलम ८८’ नुसार पुन्हा चौकशी करण्याचा इशारा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. याबाबत विचारले असता, चंद्रकांतदादा सज्जन आणि सरळ माणूस आहेत. त्यांच्या या विधानाचा आम्हाला न्यायालयात उपयोग होईल, कदाचित आम्हाला फायदा व्हावा, यासाठीच ते असे बोलले असतील, असा टोला आमदार मुश्रीफ यांनी हाणला. राजू शेट्टींना आवतण नार्कोे टेस्ट करा, म्हणून यापूर्वीच सांगितले आहे. आता बँक आमच्या हातात आहे. त्यांनी येऊन कारभार बघावा, त्यांना निमंत्रित करतो, असे सांगत आपण ‘भाबडा’ आहे, हे सांगण्यासही आमदार मुश्रीफ विसरले नाहीत. ...तर भाजपला झळा कळाल्या असत्याभाजपने कोल्हापूरऐवजी विदर्भ, मराठवाड्यात अधिवेशन घेतले असते तर त्यांना तेथील उष्णता व दुष्काळाच्या झळा कळल्या असत्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना मुख्यमंत्री मात्र सहा महिन्यांत तीन महिने विदेश दौऱ्यावरच, असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली. हसन मुश्रीफ यांची विचारणा राष्ट्रवादीवरील रागाबाबत पालकमंत्र्यांची भेट घेणार