शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

‘पी. एन.’ यांचा सल्ला दूध उत्पादकांसह नेत्यांच्याही भल्याचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 16:04 IST

‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादक संपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही.

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’वर लाखो शेतक-यांचे संसार उभे असल्याने राजकीय संघर्षात या अर्थवाहिनीला धक्का लागला तर दूध उत्पादकसंपेलच; पण त्याबरोबर जिल्ह्याची आर्थिक घडी कोलमडून पडण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पी. एन. पाटील यांनी महादेवराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांना दिलेला सबुरीचा सल्ला उत्पादकांबरोबरच नेत्यांच्या भल्याचा असेच म्हणावे लागेल.कोल्हापूरचे राजकारण साखर कारखान्यांभोवती फिरत असले तरी अर्थकारण मात्र दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. पावणेदोन वर्षांनी मिळणा-या उसाच्या पैशातून अल्पभूधारक शेतक-यांच्या जीवनात कधीच स्थैर्य आले नाही. त्यामुळे या शेतक-यांना जगविण्याबरोबरच त्यांचे संसार उभे करण्याचे काम दूध व्यवसायाने, पर्यायाने ‘गोकुळ’ने केले. कोणतीही संस्था राजकारणविरहितराहूच शकत नाही. त्यात ‘गोकुळ’च्या दुधाची चव थोडी न्यारीच असल्याने येथे सत्तेत येणाºयांना हे दूध लवकर मानवते. येथील सत्तेचा वापर करून जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता येते आणि यासाठीच सध्या महाडिक-पाटीलयांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कोणत्याही संस्थेच्या निवडणुकीनंतर विरोधक किमान चार वर्षे तिकडे फिरकत नाहीत. ‘गोकुळ’बाबतही आतापर्यंत तसेच झाले आहे; पण या वेळेला सतेज पाटील यांनी पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच आक्रमक भूमिका घेतली. दुस-या सभेला हजर न राहताच सत्तारूढ गटाच्या अहंपणाने सभा जिंकली. सभा बेकायदेशीरची प्रक्रिया सुरूअसतानाच गाय दूध खरेदी दरातील कपातीचा मुद्दा घेऊन त्यांनी गेले महिनाभर रान उठविले. उत्पादकांच्या दृष्टीने ही भूमिका न्याय्य असल्याने पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत झाले; पण या मागणीच्या आडून त्यांनी राजकीय उट्टे काढण्यास सुरुवात केल्याने उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था पसरली.महाडिक-पाटील यांच्यातील वाद कशासाठी, हे जिल्ह्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गोकुळ’चे नेतृत्व महाडिक यांच्याबरोबरच पी. एन. पाटील करतात. पण सतेज पाटील यांच्या टीकेचा रोख महाडिक यांच्यावरच राहिल्याने त्यांचा उद्देश लपून राहिलेला नाही.  राजकीय वैरत्वासाठी वेगळी मैदाने आहेत, त्या ठिकाणी ही भूमिका  कदाचित योग्यही असेल; पण सर्वसामान्य माणसांचा संसारज्या संस्थेवर उभा आहे, तिचा वापर करून एकमेकांचे उट्टे काढण्याचा हा प्रकार म्हणजे ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करणे’ असाच म्हणावा लागेल.दोन्ही नेत्यांतील वादावर शांत बसलेल्या पी. एन. पाटील यांनी मोर्चात मनातील खदखद बोलून दाखवीत ‘स्वत:च्या राजकारणासाठी ‘गोकुळ’चा वापर करू नका,’ असा सबुरीचा सल्लाही दिला. या सल्ल्यानंतर महाडिक व पाटील यांना किमान ‘गोकुळ’बाबत तरी संयमाने वागावेच लागेल. पी. एन. पाटील यांचा सबुरीचा सल्ला उत्पादकांसह दोन्ही नेत्यांच्या भल्याचा आहे. दोघांच्या भांडणात सामान्यांच्या अर्थवाहिनीला धक्का लागला तर उत्पादक उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.‘पी. एन.’ यांची सावध भूमिका-पी. एन. पाटील यांची १९९५ पासूनची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर त्यांच्या पाचपैकी चार विधानसभा निवडणुकीतील पराभव पक्षांतर्गत राजकारणामुळेच झाला आहे. ज्यांच्यासाठी विरोधकांसह स्वपक्षियांना अंगावर घेतले तेही ऐन वेळी आपले रंग दाखवीत असल्याने त्यांनी आता थोडी सावध भूमिका घेणेच पसंत केल्याची चर्चा आहे.संचालकांच्या सवयी बदलणे गरजेचे ‘गोकुळ’चे संचालकपद मानाचे आहेच; त्याबरोबर तेथील बडदास्तीमुळे ते अधिक चर्चेत राहिले. आमदारकी नको; पण संचालकपद द्या, अशी चर्चा होण्यामागे हेच कारण आहे. येथून पाठीमागे दूध उत्पादकांमध्ये जागृती नव्हती, त्यावेळेला कसेही वागले तरी कोणी विचारीत नव्हते. आता बहुतांश दूध उत्पादक हे तरुण व सुशिक्षित असल्याने दहा दिवसांचा हिशेब मांडला जातो. त्यामुळे पूर्वीच्यासवयींमध्ये संचालकांनी बदल करणे गरजेचे आहे; अन्यथा संघर्ष अटळ आहे.