शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पी. डी.’, सरनोबतांकडे एवढी प्रॉपर्टी आली कोठून?

By admin | Updated: September 23, 2015 00:59 IST

मानसिंगराव जाधव यांचा सवाल : आमच्या हेतूवर शंका घेण्यापेक्षा त्यांचा कारभार आठवावा

राजाराम लोंढे -कोल्हापूर ==शेतकरी संघाच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलच्या नेत्यांसह उमेदवारांच्या हेतूबद्दल शंका घेणारे पी. डी. पाटील, धनाजीराव सरनोबत व सुरेश देसाई यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कोठून? असा सवाल करीत, या मंडळींच्या ताब्यात संघ असताना त्यांनी काय दिवे लावलेत, हे सभासद जाणून असल्याची टीका ‘मोहिते-नेसरीकर सत्तारूढ पॅनेल’चे प्रमुख शोभादेवी शिंदे-नेसरीकर व मानसिंगराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. शोभादेवी शिंदे आणि मानसिंगराव जाधव म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही अत्यंत काटकसरीचा कारभार करून संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला. संघावरील कर्जाचा बोजा कमी करीत सभासदांना पाच वर्षांत सात टक्क्यांपासून १२ टक्क्यांपर्यंत लाभांश दिला. एकेकाळी आशिया खंडात नावाजलेल्या संघाचे वैभव परत आणण्यासाठी गेली पाच वर्षे सर्वांनी मनापासून काम केले. रुकडी येथील खताचा कारखाना सुरू केला, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले. शाखा सक्षम करून व्यवसाय वाढविला. डिझेल विभाग, चटणी-मसाले, खते हे विभाग नफ्यात आणले. संघाचे हित डोळ्यांसमोर ठेवूनच आम्ही वाटचाल केली. सत्ताधारी पॅनेलमध्ये अनुभवी चेहरे नसल्याची टीका विरोधक करीत आहेत; पण गेली ५५ वर्षे आपण सहकारात काम करीत आहोत. साखर उद्योगात संपूर्ण महाराष्ट्रात माझी ओळख आहे. त्याचबरोबर राजू पाटील, दिलीप पाटील, व्यंकाप्पा भोसले, आदी मंडळींनी सहकारात आपला ठसा उमटविला आहे. विरोधकांपेक्षा कितीतरी पटींनी अनुभवी व स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आमच्याकडे असल्याचे मानसिंगराव जाधव यांनी सांगितले. जे आमच्यावर टीका करीत आहेत, त्यांच्या काळात संघाची अवस्था काय झाली, याचे आत्मचिंतन करावे; मग आमच्यावर बोलावे. या मंडळींच्या कारभारामुळे आपण बदनाम होऊ म्हणून मी आणि स्वर्गीय शामराव शिंदे यांनी राजीनामा दिला होता. आम्हाला कधीच सत्तेची हाव नाही; पण आमच्या हेतूवर शंका घेणारे पी. डी. पाटील, सुरेश देसाई व धनाजीराव सरनोबत यांच्याकडे एवढी मालमत्ता आली कशी? याचे आत्मचिंंतन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तेच्या लालसेपोटी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. ‘मोहिते-नेसरीकर’ यांच्या विचारांवर प्रेम करणारी मंडळी आहोत. त्यांच्या विचारांना तडा जाईल, त्या दिवशी संघातून बाहेर पडू, असे जाधव व शोभादेवी शिंदे यांनी सांगितले.