शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परदेशामध्ये गाडी चालविण्याच्या परवान्यांचे नूतनीकरणही करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:24 IST

कोल्हापूर : परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांना तेथे स्वत:ची मोटार कार चालवायची असेल तर त्याकरिता वाहन परवाना असणे सक्तीचे ...

कोल्हापूर : परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांना तेथे स्वत:ची मोटार कार चालवायची असेल तर त्याकरिता वाहन परवाना असणे सक्तीचे आहे. तेथील वाहतुकीचे नियमही कडक आहेत. असे मुदतबाह्य परवाने नूतनीकरण आता प्रादेशिक परिवहन कार्यालयातही होत असल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे. कोल्हापूर आरटीओ कार्यालयात प्रत्येक वर्षी असे परवाने नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या मोठी आहे; मात्र कोरोनाच्या दोन लाटेमुळे परवाना नूतनीकरणात संख्या घटली असून, गेल्या पावणे दोन वर्षात ११६ जणांनी परवाने नूतनीकरण केले आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागाने परदेशात वाहने चालविण्याचे परवाने काढण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. स्थानिक परवान्यासाठी ज्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्याप्रमाणे या परदेशात वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर नागरिकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तारीख दिली जाते. त्या तारखेला आरटीओ कार्यालयात जाऊन नागरिकांना मूळ पासपोर्ट, व्हीसा आणि वाहन परवाना दाखविणे गरजेचे आहे. मूळ वाहन परवान्यावरील पत्ता व पासपोर्टचा पत्ता हा एकच असणे गरजेचे आहे. कार्यालयाकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाते. नूतनीकरणासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते.

कोरोना काळात संख्या घटली

२०१८- ३५५

२०१९- २०७

२०२०- ७९

२०२१ - ३७

कोण काढतो हा परवाना

जे भारतीय परदेशात नोकरी व्यवसाय, शिक्षणानिमित्त राहत असलेल्या नागरिकांना स्वत:च्या मोटारकारने तेथे फिरावयाचे आहे, अशा नागरिकांना हा आंतरराष्ट्रीय परवाना काढता येतो. याकरिता व्हीसा, पासपोर्ट, अपाॅर्ईंटमेंट लेटर, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना सादर केल्यास हा आंतरराष्ट्रीय परवाना एक वर्षाच्या मुदतीकरिता जारी होतो. हा परवाना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहीने मिळू शकतो.

असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

व्हिसा, पासपोर्ट, आधारकार्ड, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना व एक हजार रुपये शुल्क भरल्यानंतर हा परवाना कुठल्याही भारतीय नागरिकाला मिळू शकतो.

ज्या उमेदवाराकडे परदेशातील व्हिसा, पासपोर्ट, स्थानिक वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. एक वर्षाच्या मुदतीकरिता असा परवाना मिळू शकतो. हा परवाना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून उपप्रादेशिक अथवा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सहीने मिळतो. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करणे व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

कोट

कोरोनाच्या सलग दोन लाटांमुळे कोल्हापुरातून परदेशात नोकरी, शिक्षणाकरिता जाणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे गेल्या पावणेदोन वर्षात केवळ ११६ जणांनी आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना जारी करण्यात आला आहे. हा एक वर्षासाठी पात्र राहणार आहे. व्हीसाची मुदत वाढल्यास या परवान्याची मुदतही भारतीय दूतावासातून वाढवून अथवा नूतनीकरण करता येेते.

- रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर.