शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

बाबांची मात, काकांची वात

By admin | Updated: March 21, 2017 23:26 IST

बाबांची मात, काकांची वात

श्रीनिवास नागेचमत्कार घडविणाऱ्यांचे दात घशात घालत भाजपनं अखेर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवलाच. भाजप जेवढा सत्तेच्या जवळ होता, तेवढा काँग्रेस-राष्ट्रवादीचा जोडा दूर होता. एकतर सर्वाधिक संख्याबळ, त्यात केंद्रासह राज्यातली सत्ता, सत्तेत भागीदार असलेल्या घटक पक्ष-आघाड्यांकडंच असलेल्या सत्तेच्या चाव्या, जुळणीसाठी कामाला लागलेली तगडी मंडळी, शिवाय राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विरोधात एकवटलेले विरोधक यामुळं भाजपची जुळवाजुळव जमली.जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर भाजप २५ जागा घेऊन सर्वांत मोठा पक्ष बनला तरी ३१च्या ‘मॅजिक फिगर’साठी जुळणी सोपी दिसत नव्हती. कारण चार जागा हातात असलेल्या रयत आघाडीच्या काही नेत्यांनी खोडा घातला होता. आघाडीच्या नेत्यांचा राग कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांवर होता. सदाभाऊंनी परस्परच भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. (स्वत:चा एकही सदस्य नसताना!) त्यामुळं महाडिक गटानं खमकेपणा दाखवत निर्णय झाला नसल्याचं ठासून सांगितलं. इस्लामपूर नगरपालिकेतली राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्याचं श्रेय सदाभाऊंनी एकट्यानं लाटलं होतं, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार करवून घेतला होता, शिवाय इस्लामपुरातल्या महाआरोग्य शिबिरावेळी महाडिकांना निमंत्रणही दिलं नव्हतं, याची खदखद महाडिकांच्या पवित्र्यातून बाहेर पडली. तिला खासदार राजू शेट्टी-सदाभाऊ यांच्यातल्या शीतयुद्धाचीही जोड होती. दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे आमदार पतंगराव कदम आणि जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम या बंधूद्वयांनी जयंत पाटील यांना गाठलं. त्यांना जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येऊ द्यायची नव्हती. भाजप सत्तेत आला तर पृथ्वीराज देशमुखांचं वजन आणखी वाढणार होतं. (पलूस-कडेगावात आठपैकी सात जागा आल्यानं आधी ते वाढलं होतंच..) त्यात संग्रामसिंह देशमुख अध्यक्ष झाले तर कदम गटासाठी धोक्याचं होतं. त्यामुळं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली. राष्ट्रवादीकडं काँग्रेसपेक्षा जादा जागा असूनही जयंतरावांना मागं ठेवलं गेलं, कारण त्यांना असणारा तीव्र विरोध. रयत आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष, अजितराव घोरपडे गट आणि शिवसेना यांच्यासोबत बोलणी सुरू झाली. तिकडं भाजपनं दबावतंत्र सुरू केलं. रयत आघाडी, अपक्षाला घेऊन पार मुंबईपर्यंतच्या वाऱ्या केल्या. ‘कमिटमेंट’चा भडीमार केला आणि रयत आघाडीनं राजू शेट्टींचा विरोध (अप्रत्यक्ष) असतानाही ‘कमळ’ जवळ केलं. या आघाडीत महाडिकांच्या दोन, तर काँग्रेसच्या सी. बी. पाटील गटाची आणि वाळव्याच्या नायकवडी गटाची प्रत्येकी एक जागा होती. महाडिक, सी. बी. पाटील यांच्यासह भाजपला आयुष्यभर जवळ न केलेल्या नागनाथअण्णा नायकवडींच्या वारसदारांनी भाजपशी हातमिळवणी केली. अर्थात यामागं जयंतरावांना पर्यायानं राष्ट्रवादीला विरोध, हे मूळ कारण होतंच, पण उत्तर आधुनिकतावादाला चिकटून आलेल्या तत्त्वांच्या तिलांजलीवरही यामुळं शिक्कामोर्तब झालं. हा बदलत्या राजकारणाचा अस्सल नमुना.रयत आघाडीनं हिरवा कंदील दाखवताच भाजपनं शिवसेनेवर फासे टाकले. सांगलीकडं सोलापुरातूनच पाहणारे पालकमंत्री सुभाषबापू देशमुख स्वत: जातीनं इथं आले. त्यांनी भाजपचे आमदार अनिल बाबर यांना गेस्ट हाऊसवर येण्याचं निमंत्रण धाडलं. काँग्रेसचं गणित जुळत नसल्याचं स्पष्ट होताच मोहनराव कदमांशी असलेला ‘याराना’ बाजूला ठेवत बाबरही सुभाषबापूंकडं गेले. (अलीकडं त्यांचा संजयकाकांशी ‘दोस्ताना’ वाढलाय.) भाजप सरकारच्या हातात असलेली टेंभू योजनांची कामं आणि नागेवाडी साखर कारखान्याचा प्रश्न कामी आला. सहकार खातं हातात असलेल्या सुभाषबापूंनी दुखरी नस दाबली. झालं... काँग्रेसनं दिलेल्या अध्यक्षपदाच्या ‘आॅफर’वर पाणी सोडत बाबर यांनी भाजपकडून मुलासाठी उपाध्यक्षपद घेतलं! ‘सत्तेचा महिमा’, तो हाच! ...काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य असताना जयंतरावांनी म्हणावा तेवढा जोर लावला नाही. निवडीच्या आधल्या दिवशी ते ‘पिक्चर’मध्ये आले. पतंगरावांच्या बंगल्यावर जाऊन त्यांनी ‘सिक्सर’ मारण्याचा प्रयत्न केला, पण भाजपनं टाकलेल्या गुगलीनं आणि लावलेल्या ‘टाईट फिल्डिंग’मुळं जमलं नाही. गणितं फिसकटल्यानं काँग्रेसला हातावर हात चोळत बसावं लागलं.जाता-जाता : अध्यक्षपदासाठी संग्रामसिंह देशमुख यांचं नाव जाहीर होताच संजयकाका गटात सन्नाटा पसरला. संजयकाकांनी चुलते डी. के. पाटलांचं नाव मागं घेतलं. मग शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे अर्ज भरण्यासाठी पुढं आले. (ही काकांचीच चाल.) अर्थात डोंगरेंची इच्छा आधीपासूनच प्रबळ होती. ते अर्ज भरण्यासाठी आले, पण राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत! पृथ्वीराजबाबांचं काळीज लक्कदिशी हललं... अखेर सुभाषबापू देशमुखांसोबत जिल्हा परिषदेच्या आवारात आलेले संजयकाका पुढं आले आणि त्यांनी डोंगरेंना अर्ज भरताभरता थांबवलं... भाजपच्या लेखी एक बंड थंड झालं... पण काकांनी पेटवलेली वात बाबांच्या नजरेतून सुटली नाही...