शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बहारदार नृत्ये, गायन, हास्य फवाऱ्यांत रसिक चिंब

By admin | Updated: February 15, 2015 23:46 IST

राजर्षी शाहू ग्रं्रथ महोत्सव : मनोरंजनासह प्रबोधनाचा जागर; खरेदीलाही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सवाचा दुसरा दिवस नृत्याच्या तालावरील ठेका, हास्याचे फवारे आणि प्रबोधनाचा जागर यांनी गाजला़ सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल व खरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यांमुळे ‘आद्य चरित्रकार गुरुवर्य कृष्णात केळुसकर ग्रंथनगरी’त रविवारी चैतन्याचे वातावरण होते़सकाळच्या सत्राची सुरुवात मराठी चित्रपट अभिनेते वसंत हंकारे यांच्या ‘हास्यबहार’ या कार्यक्रमाने झाली. आधुनिक जीवनशैलीवर मार्मिक भाष्य करणारे अनेक विनोदी किस्से हंकारे यांनी सादर केले. ‘आमची वाटचाल’ या सत्रात राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या मीरा पाटील (यमगे, ता. कागल) व सातारा येथील शिक्षणविस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीचा आलेख मांडला. मीरा पाटील म्हणाल्या, घरची परिस्थिती बेताची असतानाही शिक्षण पूर्ण केले. नोकरीदरम्यान एम. ए. केले. पहिलीपासूनच शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारी, महिला, मुलींमध्ये शिक्षण, शारीरिक स्वच्छतेचा प्रसार यावर भर दिला. प्रतिभा भराडे म्हणाल्या, सज्जनगड परिसरातील कुपोषणाबाबत जनजागृतीसाठी माता-पालकांचे मेळावे घेऊन आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. परिसरातील मुलांना डोळ्यांचेही विकार होते. त्यांच्यासाठी नेत्रशिबिरे घेतली. सहायक शिक्षण संचालक संपत गायकवाड यांच्या हस्ते प्रतिभा भराडे व मीरा पाटील यांचा सत्कार झाला. सविता पाटील यांनी मुलाखत घेतली. पद्मिनी माने यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथमहोत्सव समितीचे सचिव सी. एम. गायकवाड यांनी संयोजन केले. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, उदय पाटील, प्राचार्य डॉ. विलास पाटील, भैरव कुंभार, राजाराम वरुटे, आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवा समितीचे अध्यक्ष भरत रसाळे यांनी आभार मानले. केदार फाळके यांनी शिवप्रभूंचे पहिले चरित्र ‘सभासद बखर’ हा स्लाईड शो सादर केला़ अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक होते़ सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन गं्रथ महोत्सव समितीचे सल्लागार प्रभाकर आरडे यांच्या हस्ते झाले़ यावेळी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे नेते एस़ डी़ लाड, विलास साठे, पंडित पोवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)उचगावच्या न्यू प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींच्या 'ललाटी भंडार...'ला दादसायंकाळाच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुला-मुलींनी बहारदार नृत्ये, गीते सादर केली़ न्यू प्राथमिक विद्यालय, उचगावच्या मुलींनी सादर केलेल्या ‘ललाटी भंडार’ गाण्यावरील नृत्याला शिट्ट्या-टाळ्यांची दाद मिळाली़ महावीर इंग्लिश स्कूलच्या मुला-मुलींनी अप्रतिम फ्युजन नृत्य सादर केले़ दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम शैलीतील तालबद्ध नृत्य सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली़