शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद, व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 14:28 IST

Bharat Bandh, FarmarStrike, Kolhapurnews केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला कोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला.

ठळक मुद्देकोल्हापूर बंदला उस्फुर्त प्रतिसाद, व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पाठींबा शहरातून दुचाकी रॅली, विधेयकाची होळी

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदलाकोल्हापूरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठींबा दिला.

शिवसेनेने शहरातून रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदवला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात एकत्रीत येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वाभाडे काढले. ह्यस्वाभिमानीह्णने शिरोळमध्ये कृषी विधेयकांची होळी केली.केंद्र सरकारने तीन कृषी विधेयक अंमलात आणल्याने त्याविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. त्याला पाठींबा देण्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. कोल्हापूरात त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. मूरगूड येथे राधानगरी ते निपाणी राज्यमार्ग रोखून धरला. कोल्हापूर शहराततील व्यापाऱ्यांनीही पाठींबा दिला. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आदी बाजारपेठेत दुकाने दिवसभर बंद होती. औषध, पेट्रोलपंप वगळता इतर सगळे व्यवहार ठप्प होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती.कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप, शेकाप यासह वीस राजकीय पक्षांनी एकत्रीत केंद्र सरकारचा निषेध केला. बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आसूड ओढले. ह्यस्वाभिमानीह्णचे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकरी एकदा अशांत झाला तर कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही.कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, गूळाचे सौदे बंद केले होते. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पाडळकर मार्केट, कपिलतीर्थ, गंगावेश येथील भाजीमंडई ओस पडल्या होत्या. बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, गुळाची आवक न झाल्याने तिथे सुमारे साडे तीन कोटीची उलाढाल ठप्प झाली. दूधाचे संकलन सुरू असले तरी त्यावरही परिणाम झाला आहे. छोटीमोठी दुकाने बंद राहिल्याने कोट्यावधीची उलाढाल थांबली. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर