बुबनाळ : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ आली आहे. गावातील माळभाग परिसरात ५० पेक्षा जास्त डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्यावतीने उपाययोजना सुरू आहेत.
गणेशवाडी माळभाग परिसरात डेंग्यूसदृश आजारांची साथ आली आहे. ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू बरोबर अनेक रुग्णांना व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव झाल्याने पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यूसदृश रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने दैनंदिन सर्वेक्षण सुरू आहे.
डासांच्या अळ्या नष्ट करणे, कोरडा दिवस पाळणे, फ्रीज पाठीमागील बाजूस साचलेले पाणी काढणे आदि सूचना वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक आर. एच. सनदी हे चार पथकामार्फत देत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणी, गटार स्वच्छता अभियान राबविले आहे. डासांचा प्रादुर्भाव जास्त असल्याने औषध फवारणी एकाचवेळी सर्वत्र करावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य बळवंत गौरवाडे यांनी केली आहे.
-------------------
कोट - ग्रामस्थांनी घरामध्ये किंवा परिसरात साचलेले पाणी नष्ट करून कोरडा दिवस पाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे.
- सरपंच प्रशांत अपिणे फोटो - ०२०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे आरोग्य विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन सर्व्हे करून साचलेले पाणी डासांच्या अळ्या नष्ट करण्यात आल्या. (छाया - रमेश सुतार)