शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

दहा कोटींसाठी चेष्टाच

By admin | Updated: August 12, 2014 00:40 IST

नुसतीच आश्वासने : महालक्ष्मी मंदिर विकास निधीचा अनुभव

विश्वास पाटील --कोल्हापूर - कोल्हापूरच नव्हे तर देशभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनबारीसाठी व अन्य विकासकामांसाठी शासनाने मंजूर केलेला दहा कोटींचा निधी देतानाही चेष्टा केल्यासारखा अनुभव येत आहे. कोल्हापुरात १५ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका दिवसांत निधी हस्तांतरित करण्याचे आश्वासन देऊनही महिना होत आला तरी निधी उपलब्ध झालेला नाही. आज सकाळी विमानतळावर पुन्हा पवार यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ‘बघतो..’ एवढेच आश्वासन दिले.शहराध्यक्ष आर. के. पोवार व इतरांनी त्यासंदर्भात शिवसेनेने केलेल्या आंदोलनाच्या बातम्याही त्यांना दाखविल्या. नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांतून त्यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मागवून घेण्यात आली. सन २०११-१२ सालात मंजूर झालेला हा निधी २०१४ उजाडले तरी अजून महापालिकेला प्राप्त झालेला नाही. भाविकांच्या श्रद्धेशी निगडित विषयांतही सरकार किती चालढकल करते याचा अनुभव त्यानिमित्ताने येत आहे. दरम्यान, पवार यांनी माणगांव येथील आंबेडकर स्मारकासाठी जाहीर केलेला दहा कोटींचा निधी सरकारने हस्तांतरित केल्याचे यावेळी स्पष्ट केले.महालक्ष्मी मंदिर विकासाचा १९० कोटी रुपयांचा प्रस्ताव २०११-१२ ला महापालिकेने नगरविकास विभागामार्फत नियोजन विभागाकडे पाठवला होता. परंतु नगरविकास विभाग कोणत्याही कामासाठी शंभर टक्के अनुदान देत नाही. म्हणून त्यांनी ५० टक्के, देवस्थान समिती व महापालिकेने प्रत्येकी २५ टक्के निधी द्यावा, असे सुचविण्यात आले. परंतु महापालिका व देवस्थान समितीची एवढा निधी देण्याची क्षमताही नाही. त्यामुळे तो प्रस्ताव तसाच बारगळला. पुढच्या टप्प्यात पंढरपूर, शेगांव देवस्थानच्या धर्तीवर दर्शनबारी व अन्य विकासकामांसाठी १० कोटी रुपये द्यावेत, असा प्रस्ताव महापालिकेने पाठवला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार फक्त २५ लाखांपर्यंतच्या कामाचे तांत्रिक मंजुरी कार्यकारी अभियंत्यांना देता येते. त्यापुढील ६२ लाखांपर्यंतचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना व त्यावरील कामांसाठी मुख्य अभियंत्यांची मंजुरी लागते. हे काम दहा कोटींचे असल्याने प्रस्ताव त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला. तोपर्यंत नियोजन विभागाने या दहा कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याने ही रक्कम मंजूर झाली होती. मग मंजूर झालेला निधी परत जाऊ नये म्हणून निधी नियोजन विभागाकडून १३ जून २०१३ ला नगरविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. नियोजन विभागाच्या उपसचिवांनी २ जुलै २०१३ ला तसे पत्राद्वारे महापालिकेलाही कळविले. त्यानंतरही वर्ष उलटले तरी हा निधी महापालिकेस अद्याप मिळालेला नाही.महापालिकेने शासनाला २५ मार्च, २३ जुलै आणि ६ डिसेंबर २०१३ ला ‘खास पत्र’ लिहून हा निधी तातडीने हस्तांतरित करण्यात यावा, असे कळविले आहे. पण त्याबाबत शासकीय दरबारी अनास्था असल्याचे दिसत असून, हा निधी म्हणजे कोल्हापूरकरांंची चेष्टाच म्हणावी लागेल.