शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

‘आपले सरकार’ची जनतेशी नाळ तुटली: शासनाच्या पोर्टलवर न्याय मिळणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:37 IST

राज्यातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले; परंतु नावीन्यपूर्ण असलेला हा उपक्रम नव्याची नवलाईच ठरल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्दे‘आपले सरकार’ची जनतेशी नाळ तुटली: शासनाच्या पोर्टलवर न्याय मिळणे बंद२१ दिवसांत निर्णय घेण्याचे धोरण पडले मागे, तक्रारींवर दोन-दोन वर्षे प्रतिसादच नाही

प्रवीण देसाई

कोल्हापूर : राज्यातील भाजप सरकारने सत्तेत आल्यावर नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले; परंतु नावीन्यपूर्ण असलेला हा उपक्रम नव्याची नवलाईच ठरल्याचे दिसत आहे. २१ दिवसांत तक्रारीवर कार्यवाही होणे अपेक्षित असताना दोन-दोन वर्षे होऊनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जनता आणि मंत्रालय अंतर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाची स्थिती पाहता, शासनाची जनतेशी असलेली नाळ तुटत चालली की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.राज्यात भाजपप्रणीत सरकार २०१४ मध्ये सत्तेत आले. त्यानंतर त्याने जनहिताचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केले. या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच तक्रार आॅनलाईनद्वारे दाखल केल्यावर २१ दिवसांत कार्यवाही होणे अपेक्षित होते. तसे सुरुवातीला वर्षभर तरी चांगल्या पद्धतीने नागरिकांच्यातक्रारींची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम झाले. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने सुरू असलेल्या या उपक्रमातून नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही करणे बंद केले.

महिला व बाल विकास विभागाशी संबंधित १५ हून अधिक तक्रारी या दोन वर्षांत दाखल केल्या आहेत; परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, हे शासनाच्या एका प्रातिनिधिक विभागाचे चित्र आहे. इतर विभागांसंबंधीही जवळपास अशीच स्थिती असल्याचे बोलले जात आहे.

या तक्रारींची दखलच नाहीमहिला आणि बाल विकास विभागाशी संबंधित बालकल्याण समिती सुविधांसंदर्भात ३१ आॅगस्ट २०१७ रोजी तक्रार क्रमांक ८६७ अन्वये दाखल तक्रारीची सद्य:स्थिती ‘जैसे थे’ आहे. ३१ आॅगस्ट २०१७ च्या नवीन बालगृह मान्यतासंदर्भात दिलेली तक्रार क्रमांक ८६८, २४ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र बाल न्याय नियमानुसार ‘एमएसडब्ल्यू’विषय पदाधिकारी नियुक्तीमध्ये वगळल्याची तक्रार क्रमांक ११२९ अन्वये आॅनलाईनद्वारे अर्ज दाखल आहे. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही; तसेच कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

या उपक्रमाची सुरुवात चांगली झाली होती. काही तक्रारींवर सुरुवातीच्या टप्प्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत २१ दिवसांत निर्णयही झाले. तसेच निर्णय झाल्यावरही मेलद्वारे ‘आम्ही केलेल्या कार्यवाहीवर आपण समाधानी आहात का?’ अशी असा फीडबॅकही घेतला जात होता. मात्र ही शासनाची नव्याची नवलाई वर्षभरानंतर बंदच झाल्याचे दिसत आहे. जवळपास १५ हून अधिक तक्रारी दोन वर्षांत दाखल करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.- अतुल देसाई, अध्यक्ष, आभास फौंडेशन 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर