शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...तर लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; राजू शेट्टींचे प्रकाश आवाडेंना आव्हान

By राजाराम लोंढे | Updated: November 12, 2023 14:33 IST

टप्याटप्याने तुमच्या दुकानदाऱ्या बाहेर काढू

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: खासदारकीसाठी ऊस दराचे आंदोलन करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे करत आहेत. त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला उर्वरित ४०० रुपये द्यावे व चालू हंगामात प्रतिटन ३५०० रुपये दर द्यावा, लोकसभेच्या निवडणूकीतून मी माघार घेतो. खुशाल तुमच्या मुलाला खासदार करा, असे थेट आव्हान देत  तुमची दुकानदारी वेगळी आहे, टप्याटप्याने तुमच्या दुकानदाऱ्या बाहेर काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिला.

राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळीबद्दल गरळ ओकण्याचे व शेतकऱ्यांच्या मनात भिती निर्माण करण्याचे काम आमदार प्रकाश आवाडे करत आहेत. यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे हे नाकारत नाही. आवाडे जेवढी भिती दाखवतात तेवढी परिस्थिती नाही. ११ नोव्हेंबर अखेर ‘वारणा’ व ‘दूधगंगा’ धरणातील तुलनात्मक पाणीसाठा पाहिला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत १ टीएमसी जादाच पाणी आहे. जर काटकसरीने पाण्याचा वापर केला तर मे अखेर पाणी टंचाई भासणार नाही. परंतु मनात भिती निर्माण करण्यासाठी धरणातील पाणी न सोडता, नद्या कोरड्या पाडणे, जाणीवपुर्वक भारनियमन वाढवणे अशी पिके वाळवण्याचे उद्योग सरकार मधील ही मंडळी करत आहेत.

प्रकाश आवाडे यांची सलगी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी आहे. मी चळवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतो, असा आरोप आवाडे करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे, चळवळीला राजकारणाचा वास येत असेल तर राज्यातील सर्व कारखान्यांनी मागील हंगामातील ऊसाचे उर्वरित ४०० रुपये व चालू हंगामातील गाळप होणाऱ्या ऊसाला ३५०० रुपये दर द्यावा, लोकसभा निवडणूक लढवत नाही. तुमचे राजकारण तुम्हाला लकलाभ असो, मी चळवळीसाठी जगणारा आणि राजकारण करणार माणूस आहे, तसे तुमचे नसल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला.

पुढचा हंगाम कसा चालवता तेच बघतो

ऊसाची लागण कमी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, गेल्या वर्षीचे ४०० रुपये मिळाले तरच शेतकरी लागणी करतील. त्यामुळे पुढचा हंगाम कसा पुर्ण क्षमतेने चालवता तेच बघतो, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी