शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा महायुतीतून बाहेर!

By admin | Updated: August 28, 2014 00:11 IST

जिल्ह्यातील चार जागांवर दावा: मुरगूडमधील मेळाव्यात ‘स्वाभिमानी’ची बारा जागांची मागणी

मुरगूड : शेतकऱ्यांसाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीमध्ये सामिल झाली असून, स्वाभिमानी कोणाच्या गळ्यातील लोढणे बनणार नाही. राज्यामध्ये आम्हाला बारा जागा मिळाल्या नाहीत, तर स्वाभिमानी संघटना महायुतीतून बाहेर पडून किमान ६८ जागांवर उमेदवार उभा करेल, असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव राजेंद्र गड्ड्याण्णावार यांनी दिला. जिल्ह्यातील कागल, चंदगड, राधानगरी, भुदरगड व शिरोळ या चार जागांवर संघटनेने आपला दावा सांगितला आहे.मुरगूड (ता. कागल) येथे दत्ता देशमुख सभागृहामध्ये आयोजित मेळाव्यात ते प्रमुख म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बंडू पाटील होते. संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. बाळासो पाटील यांनी कागल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले.गड्ड्याण्णावार म्हणाले, शेट्टी यांना कागलमध्ये पाय ठेऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल. कागल कुणाची जहागीरदारी नाही, राष्ट्रवादीने साखरसम्राटांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, म्हणून आमच्या शेतकऱ्यांचा तो शत्रू आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार शेट्टी यांनीच प्रा. संजय मंडलिक यांना महायुतीतून निवडणूक लढवण्यासाठी भाग पाडले आणि आम्हीच त्यांना मदत केली नाही असा आरोप जर कोण करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, महायुतीतील बड्या पक्षांनी जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत, तर आमचे ६८ उमेदवार तयार आहेत. जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत संघटनेने जोरदार तयारी केली आहे. मागील विधानसभेला राधानगरीमधून संघटनेला उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्याचा वचपा काढण्यासाठी कागलमधून संघटनेने संजय घाटगे यांना उमेदवारी दिली. त्यात फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा झाला हे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी ओळखून उमेदवारीबाबत योग्य निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच स्वाभिमानी संघटनेचा एक नंबरचा शत्रू असल्याचे सांगून स्वार्थासाठी संघटना कधीच कोणाची मनधरणी करीत नाही. जर सन्मानपूर्वक तोडगा निघाला नाही तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू. स्वागत व प्रास्ताविक सागर कोंडेकर यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासो पाटील, नामदेव भराडे, प्रा. अविनाश मगदूम, व्यंकटराव पाटील, कौशिक मुजूमदार, तानाजी चौगुले, ताजानी मगदूम, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी कळमकर-यमगेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)