शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा कुलगुरूंना घेराव, ठिय्या आंदोलन करणार, ‘अभाविप’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 16:17 IST

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे अन्यथा कुलगुरूंना घेराव, ठिय्या आंदोलन करणार, ‘अभाविप’चा इशारापदवी प्रमाणपत्र अहवालासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) प्रांतसहमंत्री साधना वैराळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.वैराळे म्हणाल्या, या पदवी प्रमाणपत्रांतील सहीचा गोंधळ, दुबार छपाईमधील आर्थिक नुकसानाबाबत अभाविपने दि. १६ जुलै २०१८ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवेळी आंदोलन केले. त्यामध्ये या प्रमाणपत्राबाबत झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली.

या समितीच्या अहवालाबाबत गेल्या आठवड्यात आम्ही कुलगुरुंकडे विचारणा केली. त्यावर त्यांनी अहवाल सादर झाला असून दि. २२ मार्चला होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याचे सांगितले.

या दिवशी अहवाल सादर झाला नाही, तर आम्ही आंदोलन सुरू करणार आहे. दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करून तो विद्यापीठ निधीमध्ये जमा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. या पत्रकार परिषदेस अभाविपचे प्रांतसहमंत्री प्रविण जाधव, कोल्हापूर महानगरमंत्री सोहम कुऱ्हाडे उपस्थित होते.

प्रशासनाची दिरंगाईया अहवालाबाबत अभाविपने वारंवार पाठपुरावा केला. पत्रव्यवहार केला, तरीही विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात दिरंगाई केली असल्याचे वैराळे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर