शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:49 IST

प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला.

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांबाबत बारावीच्या लेखी परीक्षेपूर्वी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने गुरुवारी कोल्हापुरात दिला. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महासंघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या.हा मोर्चा टाउन हॉल, दसरा चौक, बिंदू चौक, महापालिका चौकमार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे आला. तेथे शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष पी. एन. औताडे, उपाध्यक्ष एन. डी. बिरनाळे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश देसाई, सहसचिव प्रा. एन. बी. चव्हाण यांनी केले.सन २००३ ते २०११मधील शासनमान्य ९३५ वाढीव पदांपैकी दुसºया टप्प्यात मान्यता झालेल्या १७१ व तिसºया टप्प्यातील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदीचा प्रश्नही सोडवावा. नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर लागलेल्या सर्व प्रकारच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सन २०११पासूनच्या नवीन वाढीव पदांना शासनाने मंजुरी द्यावी. कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र व्हावे.धारणी (अमरावती) : येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाइल हाणामारी झाली. या प्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली. धारणी तालुक्यातील चटवाबोड व खाºयाटेंभरू येथील जिल्हा परिषद शाळांच्या संघादरम्यान कबड्डीचा अंतिम सामना सुरू होता. पंचायत समिती सभापती रोहित पटेल व उपसभापती जगदीश हेकडे पंचांची कामगिरी बजावित होते. पंचांच्या एका निर्णयावर वाद निर्माण होऊन दोन्ही पक्षांतील शिक्षक आमने-सामने आले. वाद विकोपाला गेल्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. 

टॅग्स :examपरीक्षा