शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ८५ टक्के पॉस मशीन बंद ; अन्यथा आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:21 IST

गेल्या काही दिवसांपासून रेशन धान्य दुकानांतील पॉस मशीन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या मशीनमधील तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त करून सेवा पूर्ववत करा. अन्यथा येत्या दोन दिवसांत आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी रेशन बचाव समितीने शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांच्याकडे बुधवारी केली.

ठळक मुद्देशहरातील ८५ टक्के पॉस मशीन बंद ; अन्यथा आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्यारेशन बचाव समितीची शहर पुरवठा अधिकाऱ्यांकडे मागणी

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून रेशन धान्य दुकानांतील पॉस मशीन बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या मशीनमधील तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त करून सेवा पूर्ववत करा. अन्यथा येत्या दोन दिवसांत आॅफलाईन धान्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी रेशन बचाव समितीने शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव यांच्याकडे बुधवारी केली.शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने पॉस मशीन (पार्इंट आॅफ सेल) बोटाचा ठसा उमटवून ओळख पटवूनच रेशन दुकानदारांना प्रमाणभूत धान्य लाभार्थ्यांस द्यावे लागते. ही मशीन भाड्याने घेऊन रेशन दुकानदारांना चालवण्यास दिली आहेत. त्यात १ मार्चपासून शहरातील ८५ टक्के रेशन दुकानांतील पॉस मशीनमध्ये बिघाड झाला आहे.

याबाबत तक्रार करूनही ती अद्याप दुरुस्त करून दिली जात नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या रोषास दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मशीनमधील बिघाड त्वरित दूर करून मशीन ताब्यात द्यावीत. अन्यथा आॅफलाईन पद्धतीने धान्य विक्री करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली.

यावेळी शहर पुरवठा अधिकाऱ्यांनी पॉस मशीन पुरवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींना कार्यालयात बोलावून समज दिली. या प्रतिनिधीने आधार सर्व्हर डाऊन असल्याने हा दोष निर्माण झाला आहे. तो दुरुस्तीकरिता दोन दिवसांचा अवधी लागणार असल्याचे सांगितले.

समितीचे नेते चंद्रकांत यादव यांनी दोन दिवसांत हा बिघाड दुरूस्त झाला नाही, तर आॅफलाईन धान्य विक्रीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, गजानन हावलदार, राजेश मंडलिक, साताप्पा भास्कर, तानाजी चव्हाण, अशोक सोलापुरे, अरुण शिंदे, दीपक शिराळे, बाळू कांबळे, आदी उपस्थित होते.बायोमेट्रीक पद्धत बंद कराकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन, खासगी कंपन्यांनी बायोमेट्रीक हजेरी बंद केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रेशन धान्य दुकानातील पॉस मशीनचा वापर बंद करावा, अशीही मागणी रवींद्र मोरे यांनी केली. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू, असे उत्तर शहर पुरवठा अधिकारी शिंदे-जाधव यांनी दिले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर