शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळ्यांसह इतर करांचे दरही ‘जैसे थे’, स्थायी समिती सभापतींची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 13:59 IST

कोल्हापूर शहरातील मिळकतीच्या घरफाळ्यासह कोणत्याही कराच्या आकारणीत वाढ होणार नाही. २०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही घरफाळा आकारणी करण्याचा प्रस्ताव तसेच गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता, तोच प्रस्ताव आहे तसा चर्चेसाठी मंगळवारी (दि. १२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या

ठळक मुद्देघरफाळ्यांसह इतर करांचे दरही ‘जैसे थे’स्थायी समिती सभापतींची माहिती : प्रस्ताव चर्चेसाठी मंगळवारच्या सभेपुढे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील मिळकतीच्या घरफाळ्यासह कोणत्याही कराच्या आकारणीत वाढ होणार नाही. २०१८-१९ मधील आकारणीप्रमाणेच २०१९-२० मध्येही घरफाळा आकारणी करण्याचा प्रस्ताव तसेच गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता, तोच प्रस्ताव आहे तसा चर्चेसाठी मंगळवारी (दि. १२) होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतर करांमध्येही कोणतीही वाढ न करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे सर्वसाधारण सभेतही हा प्रस्ताव उपसूचनेसह मंजूर करण्यात येणार आहे. स्थायी सभेनंतर सभापती शारंगधर देशमुख यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.सभापती देशमुख म्हणाले, शहरामध्ये सेवा व सुविधा देण्यासाठी विविध माध्यमांतून कर घेण्याची पद्धती आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरफाळा पद्धती असून २०११ मध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा पद्धती आकारणीला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील सर्व मिळकतींच्या घरफाळ्यामध्ये भरमसाट वाढ झालेली आहे. व्यावसायिक इमारतींच्या आणि भाड्याने दिलेल्या मिळकतींच्या घरफाळ्याची चुकीच्या पद्धतीने आकारणी झाल्यामुळे शहरवासीयांतून संतापाची लाट उसळत आहे.शुक्रवारी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेसमोर घरफाळा आकारणी २०१८-१९ च्या आकारणीनुसार करण्याचा प्रस्ताव सादर आला होता. प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तो मंगळवारच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्याचा निर्णय झाला. सर्वसाधारण सभेतही या विषयावर चर्चा होऊन कोणतीही वाढ करण्यात येणार नाही, पण तो उपसूचनेसह मंजूर करण्यात येणार असल्याचे सभापती शारंगधर देशमुख यांनी सांगितले.दरम्यान, चुकीच्या सूत्रानुसार आकारणी केलेल्या वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा घरफाळा भरमसाट वाढल्याने तो २५ टक्क्यांपर्यंत कमी करावा, अशी मागणी क्रिडाई संघटनेच्या वतीने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती. त्यावरही सभेत चर्चा होणार आहे.

पाणीपुरवठा, इस्टेट, परवाना करातही वाढ नाहीघरफाळ्यासह पाणीपुरवठा, इस्टेट, परवाना, नगररचना, अग्निशमन दल आदींच्या वतीने आकारणी करण्यात येणाºया करातही कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. त्याबाबतचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात येणार असल्याचेही सभापती देशमुख यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर