येथील जैन सांस्कृतिक भवनात राजर्षी शाहू पतसंस्थेच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आलासे बोलत होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक दादासाहेब पाटील यांनी दिल्ली येथे शेतकरी विरोधी विधेयके रद्द करावीत यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव मांडला. या ठरावाला सवार्नुमते मंजुरी देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील, संचालक जिनगोंडा पाटील, दादासाहेब पाटील, धनपाल कोथळे, राजाराम कदम, महावीर पोमाजे, मिरअहमद बागवान, शांताबाई उगारे, दौलत कांबळे,महावीर गाडवे, धोंडीराम चौगुले, अण्णासाहेब गुदले, राजेंद्र जोंग यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. अहवाल वाचन व्यवस्थापक संजय गज्जनावर, तर उपाध्यक्षा सुषमा उपाध्ये यांनी आभार मानले.
फोटो - २५०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत किरण आलासे यांनी मार्गदर्शन केले.