शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही त्यांचे हृदय धडधडते!, कोल्हापुरात अवयवदान चळवळीला मिळतंय बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 18:01 IST

शासकीय रुग्णालयात अवयव रोपण होत नसल्यामुळे तेथे एकही अवयव प्रत्यारोपण झालेले नाही

संदीप आडनाईककोल्हापूर : ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या रुग्णालयामार्फत दोन दात्यांनी सहा जणांना अवयव दान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. शासकीय रुग्णालयात अवयव रोपण होत नसल्यामुळे तेथे एकही अवयव प्रत्यारोपण झालेले नाही. नेत्ररोपणात मात्र शासकीय रुग्णालयाने बाजी मारली आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये तब्बल ४१ नेत्ररोपण झाले आहे.

तीन दात्यांचे तीन अवयव दानकोल्हापुरातील देवाळे, ता. करवीर येथील एका दात्याने एप्रिल २०२२ मध्ये एक यकृत, एक किडनी आणि एक हृदय दान केले. त्याचे यकृताचे प्रत्यारोपण आधार हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. एका किडनीचा एक भाग आधारला तर दुसरा पूना हॉस्पिटलला देण्यात आला. मे २०२२ मध्ये २४ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे ३८ वर्षीय भाजी विक्रेत्याला यकृत बसविले, तर चौघांना त्याचे डोळे, मूत्रपिंड, हृदय बसवल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले.अवयवांसाठी प्रतीक्षा यादी मोठीपुणे विभागात विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडे (झेडटीसीसी) गेल्या वर्षांत फक्त ४६ अवयवदान केले आहे आणि अवयव प्रत्यारोपणासाठी पाच हजारांहून अधिक जणांची मागणी आहे.जनजागृतीची गरजजनजागृतीचा अभाव असल्याने भारतात अवयवदानास कमी प्रतिसाद मिळतो. प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये ४९ आणि अमेरिकेमध्ये ३० टक्के अवयवांचे दान केले जाते. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ ०.५ अवयवदान एवढे कमी आहे. भारतात केवळ तीन टक्के नोंदणीकृत अवयवदाते आहेत, असे अवयवदानाच्या प्रणेत्या डॉ. शीतल महाजनी यांनी सांगितले.

कोणते अवयव दान करता येऊ शकतात?मूत्रपिंड, फुप्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप आणि कानांचे डूम.अवयव दानाची प्रक्रिया काय?रुग्णालयाकडून संबंधित रुग्णाची माहिती झेडटीसीसीला दिली जाते. या समितीकडून संबंधित हॉस्पिटलला अवयवदान करण्यासाठी लागणारी मान्यता, रुग्णाची माहिती, गरजू रुग्णाची माहिती, रक्तगट, डॉक्टरांचा अहवाल, रुग्णाची तसेच कुटुंबाची संमती आदींची तपासणी केली जाते. प्राधान्यक्रमानुसार रुग्णाने केलेली मागणी, हॉस्पिटलची नावे समितीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातात. त्याची माहिती हॉस्पिटलला दिली जाते. अवयवदान करणाऱ्याचे आणि प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाचे नाव गुप्त ठेवले जाते. प्रत्यारोपणाचा सर्व खर्च रुग्णाकडून केला जातो.

वर्षभरात किती दात्यांनी केले अवयव दान?अवयव  -  दातेहृदय - २मूत्रपिंड -२यकृत -२फुप्फुस -०नेत्र - ४१

अवयवदान हेच श्रेष्ठदान आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून नातेवाईकांनी आपल्या व्यक्तीचे अवयव दान करणे ही मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे. - डाॅ. गिरिश कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, राजर्षि शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर