शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
9
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
10
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
11
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
12
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
13
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
14
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
15
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
16
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
17
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
18
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
19
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
20
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप

संदीप सुतारवर कारवाईचे आदेश

By admin | Updated: September 20, 2014 00:22 IST

दिलीप सावंत : धमकी प्रकरण; जिल्हाभरातून तीव्र निषेध

सांगली : ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक अविनाश कोळी यांना जिवे मारण्याची धमकी देणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख संदीप सुतार याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईची प्रक्रिया सुरु असली तरी, त्याला प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करावी, असे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी विश्रामबाग पोलिसांना दिले आहेत.सुतारने जिल्हाप्रमुख पदावर असताना शुभेच्छाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीपोटी त्याने ३५ हजारांचा धनादेश दिला होता. मात्र हा धनादेश वठला नाही. त्यामुळे पुन्हा त्याने नव्याने धनादेश दिला. पण तोही वठला नाही. त्यामुळे ‘लोकमत’ने त्याच्याविरुद्ध सांगलीच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी सुतारची जिल्हा प्रमुखपदावरुन उचलबांगडी केली आहे. गेल्या आठवड्यात (१२ सप्टेंबर रोजी) कोळी यांना सुतारने मोबाईलवर संपर्क साधून, ‘तुझ्यामुळे माझे जिल्हा प्रमुखपद गेले आहे, तुला जिवंत ठेवणार नाही. तुला संपविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे’, अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करणारा एसएमएसही पाठविला होता. या प्रकारानंतर कोळी यांनी त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पुढे केला. त्यामुळे अटक करण्याऐवजी त्याला ७२ तासात पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस दिली. यामुळे त्याने न्यायालयातून जामीन मंजूर करुन घेतला आहे. पोलीसप्रमुख सावंत यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांच्याशी संपर्क साधून, तपास काय केला, याचा आढावा घेतला. त्यांनी सुतारला प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करून विशेष शाखेसमोर हजर करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)जतमध्ये कारवाईची मागणीजतमध्ये पत्रकारांच्या बैठकीत संदीप सुतारचा निषेध केला. पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी जयवंत आदाटे, दिनराज वाघमारे, मनोहर पवार, मारुती मदने, किरण जाधव, भागवत काटकर, मच्छिंद्र बाबर, विजय नाईक, प्रकाश माळी, नारायण भोसले, अमित कुलकर्णी, संभाजी सावंत, विरपाक्ष येवले, अंकुश क्षीरसागर, केरप्पा हुवाळे, गजानन पतंगे, सुभाष हुवाळे उपस्थित होते. सांगलीतही निषेधजिल्हा मराठी पत्रकार संघ व वृत्तवाहिनी संघटनेने सुतारचा निषेध केला. सुतारवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवाजी कांबळे, रवींद्र कांबळे, आसिफ मुरसल, रॉबीन डेव्हीड, स्वाती चिखलीकर, राजेंद्र कांबळे, कुलदीप देवकुळे, अरूण मोडक, प्रवीण शिंदे उपस्थित होते.