शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

दैवज्ञ गोल्डमेक प्रदर्शन आजपासून

By admin | Updated: January 16, 2015 00:42 IST

कोल्हापूर : सुवर्ण कारागीरही धरणार आधुनिकतेची कास

कोल्हापूर : अलंकार बनविण्यासाठी लागणाऱ्या विविध यंत्रांच्या सहाय्याने कोल्हापूरची सुवर्ण कारागिरी जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा उजळावी. याकरीता दैवज्ञ शिक्षण समाजच्यावतीने सुवर्णकारागीरांना लागणाऱ्या मशिनरीचे प्रात्यक्षिकांसह प्रदर्शन उद्यापासून दैवज्ञ बोर्डिंग समाज येथील गंगाधर पेंडूरकर सभागृहात भरत आहे. या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी दुपारी विविध यंत्रांची चाचणी घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. कोल्हापुरी साज, ठुशी, अशा विविध सुवर्णालंकारांची निर्मिती कोल्हापुरात होते. मात्र, सध्या दिल्ली, राजकोट, आग्रा, कलकत्ता, तंजावर, बडोदा, ग्वाल्हेर, मुंबई आदी शहरांतून कोल्हापुरात बनणारे सुवर्णालंकार तेथून कोल्हापूरसह देशभरात विक्रीसाठी जात आहेत. त्याला स्पर्धा व गुणवत्ता कारणीभूत आहे. कोल्हापुरातील कारागीर धंद्यात मंदी आहे, एवढेच सर्वत्र सांगत असतात. मात्र, प्रत्यक्षात तयार दागिन्यांच्या विविध कंपन्याच्या शोरूम कोल्हापुरात होत आहेत. या ठिकाणी विक्री होणारे सुवर्णालंकार पाहिले असता, ते राजकोट, ग्वाल्हेर, दिल्ली, आग्रा, मुंबई, तंजावर, सूरत, अहमदाबाद आदी ठिकाणांहून तयार केलेले असते. विशेष म्हणजे या शोरूममध्ये विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात हे दागिने येत आहेत. मात्र, कोल्हापूर हे सुवर्ण अलंकारासाठी जगभरात प्रसिद्ध असूनही यामध्ये कमी पडत आहे. स्पर्धेच्या काळात नाजूक दागिन्यांची वाढती मागणी व पुरवठा यात शहरातील सुवर्णालंकार कारागीर मागे पडत आहेत. त्याचा विचार केला तर आजही हाताने बनविलेल्या अलंकारावरच अनेक सुवर्णकार बंधू व्यवसाय करत आहेत. मात्र, आधुनिक जगाचा विचार करता यंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे काळाची गरज बनली आहे. याचा विचार करून दैवज्ञ समाज शिक्षण (बोर्डिंग) या संस्थेने पुढाकार घेऊन आधुनिक प्लेटिंग मशीन, अंगठी कारागीरांसाठी लागणारी सर्व अद्यावत मशिनरी, इलेक्ट्रीक आटणी मशीन, सर्वप्रकारचे जोडकाम करण्यासाठी लागणारी मशिनरी, पॉलिश मशीन, कास्टिंग ब्रेसलेटचे मशीन, थ्री इन वन कास्टिंग मशीन, कॅडकॉम मशीन, मेडिया पॉलिशर यासह कॅटलॉग, हत्यारे व उपकरणे या प्रदर्शनात आणली आहेत. या प्रदर्शनाची जय्यत तयारी आज संस्थेच्या पेंडुरकर सभागृहात दिवसभर सुरू होती. (प्रतिनिधी)रिफायनरीचे आकर्षणया प्रदर्शनात २ किलो क्षमतेचे सुवर्ण रिफायनरी मशीन व पाच किलो चांदी रिफायनरी मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. या मशिनरी कमी जागेत सामावणाऱ्या आहेत. त्यामुळे या रिफायनरी मशीनचे सुवर्ण कारागीरांना मोठे आकर्षण असणार आहे. याशिवाय दिवसभरात शेकडो अंगठया तयार करणारे मशीनही आकर्षण ठरेल, असा कयास प्रदर्शन संयोजकांना आहे.