शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

वारणा पाणी योजनेस विरोध, घुणकी, भादोलेत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:55 IST

नवे पारगाव/किणी/भादोले : इचलकरंजीच्या प्रस्तावित अमृत पाणी योजनेच्या विरोधात व निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी व भादोले या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात कडकडीत बंद पाळण्यात आला. वारणाकाठच्या चौदा गावांच्या नागरिकांनी पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला.मोटारसायकलची रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांतील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, चावरे, ...

नवे पारगाव/किणी/भादोले : इचलकरंजीच्या प्रस्तावित अमृत पाणी योजनेच्या विरोधात व निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील घुणकी व भादोले या दोन जिल्हा परिषद मतदारसंघात कडकडीत बंद पाळण्यात आला. वारणाकाठच्या चौदा गावांच्या नागरिकांनी पाठिंबा देत उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदविला.मोटारसायकलची रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांतील निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, चावरे, तळसंदे, वाठार, घुणकी, किणी, अंबप, अंबपवाडी, पाडळी, भादोले, मनपाडळे या गावांत शंभर टक्के बंद पाळून नागरिकांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.घुणकीचे सरपंच राजवर्धन मोहिते, माजी उपसरपंच प्रभाकर कुरणे, अशोकराव जाधव, तानाजी जाधव, वारणेचे संचालक सुभाष जाधव, किणीचे सरपंच बाळगोंडा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख संपतराव पोवार, अध्यक्ष शिवाजी माने, कृती समिती प्रमुख महादेव धनवडे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव सिद, ‘वारणा’चे संचालक महेंद्र शिंदे, वाठार सरपंच नारायण कुंभार, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सर्जेराव गायकवाड, अनिल शिंदे, आदींनी सहभाग घेतला.दोन जिल्हा परिषद मतदारसंघांतील मोटारसायकल रॅलीची सांगता वाठार (हातकणंगले) येथील उड्डाण पुलाखाली निषेध सभेने झाली. या सभेत इचलकरंजीची पाणी योजना उधळून लावण्यासाठी कृती समितीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे घुणकीचे सरपंच राजवर्धन मोहिते यांनी स्पष्ट केले.वारणाकाठच्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी अमृत पाणी योजना उधळून लावणार आहोत. वारणेच्या पाण्याचा एक थेंबही इचलकरंजीला देणार नाही, असा सज्जड इशारा वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी दिला. वारणा बचाव कृती समितीस जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी दोन जिल्हा परिषद मतदारसंघात बंद ठेवून आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वी केला आहे. राज्य शासनाने अजून आपली भूमिका बदलली नाही तर यापुढे अजून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वारणा बचाव कृती समितीचे प्रमुख महादेव धनवडे यांनी दिला.लढा यशस्वी करण्याचा निर्धारवाठारचे सरपंच नारायण कुंभार यांनी वारणाकाठच्या लोकांनी वज्रमूठ बांधून या योजनेस कडाडून विरोध करावा, असे आवाहन केले. प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारणाकाठच्या जनतेचा लढा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करणार, असे मत राष्ट्रवादीचे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी योजनेमुळे शेतकºयांना होणाºया परिणामाची माहिती दिली.