शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कंपनीच्या टोलला विरोधच

By admin | Updated: April 5, 2016 00:57 IST

कृती समितीचा इशारा : सक्ती केल्यास जनआंदोलन उभारणार

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणातील सुप्रीम कंपनीच्या टोल वसुलीला आमचा विरोध असून, सक्तीने टोल वसुली सुरू झाल्यास जनआंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला जाईल़ यामुळे कंपनीला टोल वसुलीला परवानगी देऊ नये, अशा इशाऱ्याचे निवेदन सर्वपक्षीय अन्यायकारक टोलविरोधी कृती समिती जयसिंगपूरच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी अमित सैनी व बांधकाम विभागाला दिले़ कोल्हापूर-सांगली महामार्गांतर्गत १ मे पासून टोल सुरू करण्याच्या हालचाली झाल्यानंतर जयसिंगपूर येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने दोन बैठका घेऊन टप्प्या-टप्प्याने आंदोलनाची तयारी केली आहे़ सोमवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमित सैनी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन टोल वसुलीला विरोध दर्शविला़ चौपदरी रस्त्याचा शिरोळ, इचलकरंजी, सांगली येथील बहुसंख्य वाहनधारक १० ते १२ किलोमीटरचा वापर करीत असताना सक्तीने व अन्यायकारक टोल वसुलीला प्रामुख्याने विरोध आहे़ चौपदरीकरणाचे संपूर्ण काम हे तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट दर्जाचे असून, अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार अजून हे काम अपूर्ण आहे़ त्यातच १ मे पासून टोल वसुलीचा घाट घातला जात आहे़ मुदतीत काम न झाल्यामुळे वाढलेल्या खर्चास कंपनी जबाबदार असताना वाढीव रकमेची जबाबदारी शासनाने न घेता कंपनीकडून वसूल करावी़ म्हणजेच शासनाच्या धोरणानुसार २०० कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांना टोल बसविला जाणार नाही़ शासनाकडे आपल्या भावना कळविल्या जातील, असे जिल्हाधिकारी सैनी यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले़ शिष्टमंडळात नगराध्यक्ष युवराज शहा, धनाजीराव चुडमुंगे, शैलेश आडके, अ‍ॅड़ संभाजीराजे नाईक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, प्रकाश झेले, अमरदीप कांबळे, सुनील शेळके, रघुनाथ देशिंगे, शिवाजी माळी, बजरंग खामकर, भूपाल विभूते, संजय वैद्य, बबन यादव, चंद्रकांत जाधव यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)