शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आवाडेंच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहर भाजप कार्यालयात बुधवारी झालेल्या कार्यकारिणी व नगरसेवक यांच्या बैठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला जोरदार विरोध केला. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी, आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला वरिष्ठांनी पूर्णविराम दिल्याची माहिती पक्षश्रेष्ठींनी दिली असल्याचे या बैठकीत सांगितले.पक्ष विस्तार आणि ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुका या विषयावर येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहर भाजप कार्यालयात बुधवारी झालेल्या कार्यकारिणी व नगरसेवक यांच्या बैठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला जोरदार विरोध केला. जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी, आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाला वरिष्ठांनी पूर्णविराम दिल्याची माहिती पक्षश्रेष्ठींनी दिली असल्याचे या बैठकीत सांगितले.पक्ष विस्तार आणि ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुका या विषयावर येथील भाजपच्या शहर कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष शेळके, नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी, नगरपालिकेचे भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शहर अध्यक्ष शहाजी भोसले, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष वैशाली नायकवडे, नगरसेवक-नगरसेविका, तसेच शहर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीची माहिती भाजप शहर अध्यक्ष शहाजी भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आवाडेंच्या भाजप प्रवेशाबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे बुधवारी शहरात हाच विषय उलट-सुलट चर्चेचा झाला होता. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लवकरच असल्यामुळे ग्रामीण परिसरातून सुद्धा हीच चर्चा रंगली होती. तर सोशल मीडियावरून प्रवेशाबाबतच्या अनेक प्रकारच्या पोस्ट टाकल्या जात होत्या. तर अनेक प्रकारच्या अफवांनाही उधाण आले होते.नगरसेवक, कार्यकारिणी बैठकीत कार्यकर्ते संतप्तबैठक सुरू झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाचा प्रश्न उपस्थित केला. तसेच काहींनी संतप्तपणे आवाडेंच्या प्रवेशाला जोरदार विरोध केला पाहिजे. तसेच कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रवेश रोखून धरला पाहिजे, असे सांगितले. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन जिल्हाध्यक्ष शेळके यांनी, आवाडेंच्या प्रवेशाबाबत आपण वरिष्ठांशी दूरध्वनीवरून बोललो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत यापूर्वीच पोहोचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आवाडेंच्या पक्ष प्रवेशाला पूर्णविराम दिला असल्याचेही स्पष्ट केले.