शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट ताकद लावणार

By admin | Updated: February 19, 2015 23:39 IST

महाडिक गट सक्रिय : पॅनेलमध्ये बावडा केंद्रस्थानी

रमेश पाटील - कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादीवर दाखल झालेल्या सर्व १६ हरकती नुकत्याच फेटाळण्यात आल्या होत्या. याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आल्याने ‘राजाराम’च्या निवडणुकीत विरोधी गट पूर्ण ताकदिनिशी रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे.राजारामची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी प्राथमिक मतदार यादी जाहीर झाली. या यादीवर १६ हरकती दाखल झाल्या. या सर्व हरकती सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) वाय. व्ही. सुर्वे यांनी फेटाळून लावल्या. हरकती फेटाळल्यानंतर विरोधी माजी मंत्री सतेज पाटील गटाने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आणि निवडणूक ताकदिनिशी लढविण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली.प्राथमिक मतदार यादीवर हरकती घेणारे सर्व शेतकरी कसबा बावड्यातील आहेत. ४२४१ सभासदांच्या सभासदत्वावर या हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निकालाबाबत पाच वेगवेगळ्या याचिकांद्वारे आर. के. पाटील, विश्वास नेजदार, बाळासाहेब पाटील, अनंत पाटील, नितीन पारखे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.दरम्यान, या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदिनीशी रिंगणात उतरणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, सध्या पॅनेल तयार करण्याचे काम सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक ही लढविली जाणार आहे, सध्या त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.मतदार यादीची प्रक्रिया सुरूच राहणारआपण दिलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयात हरकतदारांनी दाद मागितली आहे. मात्र, जोपर्यंत उच्च न्यायालयाकडून कोणताही आदेश येत नाही तोपर्यंत आपण मतदार यादीची प्रक्रिया तशीच सुरूच ठेवणार आहे.- वाय. व्ही. सुर्वे, प्रादेशिक सहसंचालक (साखर)‘राजाराम’कडे जिल्ह्याचे लक्षराजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील आमने-सामने येणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. सतेज पाटील गट या निवडणुकीबाबत आक्रमक झाला आहे. आमदार महाडिक गटानेही निवडणुकीची तयारी जोरात सुरू ठेवली आहे.दोन्ही पॅनेलमध्ये बावड्याला स्थानराजारामच्या निवडणुकीत सत्तारूढ आणि विरोधी अशा दोन्ही पॅनेलमध्ये प्रत्येकी दोन ते तीन उमेदवारांना हमखास स्थान मिळणार आहे. कारण ‘राजाराम’च्या निवडणुकीत बावडा केंद्रस्थानी असणार आहे.