शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी-उद्योजकांंची महापालिकेसमोर निदर्शने, सकारात्मक निर्णयाचे महापौरांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 20:46 IST

कोल्हापूर महापालिका क्षेत्रात भाडेकरू असलेल्या वाणिज्य इमारतीबाबतीत मिळकत कराचे प्रमाण वार्षिक भाड्याच्या ७० टक्के आहे, ते ‘ड’वर्ग महापालिकेच्या तुलनेत सातपट आहे, हा जाचक कर कमी करून तो २५ टक्क्यांपर्यंत आणावा, या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली व्यापारी-उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांनी सोमवारी दुपारी महापालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी महापौर सरिता मोरे यांनी, कर आकारणीतील चूक मान्य करत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आंदोलकांना दिले.

ठळक मुद्देव्यापारी-उद्योजकांंची महापालिकेसमोर निदर्शने, सकारात्मक निर्णयाचे महापौरांचे आश्वासन वाणिज्य वापरातील भाडेपट्टी मिळकतींचा कर कमी करण्याची मागणी

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात भाडेकरू असलेल्या वाणिज्य इमारतीबाबतीत मिळकत कराचे प्रमाण वार्षिक भाड्याच्या ७० टक्के आहे, ते ‘ड’वर्ग महापालिकेच्या तुलनेत सातपट आहे, हा जाचक कर कमी करून तो २५ टक्क्यांपर्यंत आणावा, या मागणीसाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली व्यापारी-उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांनी सोमवारी दुपारी महापालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी महापौर सरिता मोरे यांनी, कर आकारणीतील चूक मान्य करत सर्वांना विश्वासात घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन आंदोलकांना दिले.महापालिकेच्यावतीने वाणिज्य इमारत मिळकत कराचा दर हा जास्त आहे, त्यामुळे कोल्हापूर शहरात मोठमोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या, आय.टी. कंपन्या यायला तयार नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. शासनाने मालमत्ता करात सुसूत्रता आणण्यासाठी करपात्र मूल्यावर मालमत्ता कर आकारण्याऐवजी मालमत्तेच्या भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारण्यासंबंधी महापालिकेने एप्रिल २०१० मध्ये निर्णय घेतला.

यामुळे व्यावसायिक भाड्याच्या मिळकतींना मात्र भांडवली मूल्याऐवजी भाडेतत्त्वावर आधारित कर आकारणी विनियमातील सूत्रानुसार चालूच राहिली आहे. त्यामुळे वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कित्येक पटीने वाढला आहे. तो ७० टक्क्यांवरून किमान २५ टक्क्यांपर्यंत आणावा, अशी मागणी विविध संघटनांनी करत महापालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली.महापौर सरिता मोरे यांनी आंदोलकांसमोर जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी, सर्वांना विश्वासात घेऊन वाणिज्य वापरातील भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, आदी उपस्थित होते.

या आंदोलनात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव, असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंगचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह ललित गांधी, आनंद माने, राजीव परीख, अभिजित मगदूम, शिवाजीराव पोवार, प्रकाश देवलापूरकर, धनंजय दुग्गे, संपत पाटील, जयंत गोयाणी, राहुल नष्टे, अजित कोठारी, आदींचा सहभाग होता.

आंदोलनात सहभागी संघटनाकोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज, क्रिडाई कोल्हापूर, असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अ‍ॅड इंजिनिअरिंग, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कोल्हापूर क्लॉथ मर्चंट असोसिएशन, इलेक्ट्रीक मर्चंटस् असोसिएशन, हॉटेल मालक संघ, किराणा भुसारी असोसिएशन, आदी सहभागी होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर