शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णया विरोधात सह्यांची मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:39 IST

राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील रिक्षा स्क्रॅप करण्याच्या निर्णया विरोधात सोमवारी बिंदू चौकात महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने सह्यांची मोहिमेस प्रारंभ केला.

ठळक मुद्देरिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णया विरोधात सह्यांची मोहिममहाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे आंदोलन

कोल्हापूर : राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील रिक्षा स्क्रॅप करण्याच्या निर्णया विरोधात सोमवारी बिंदू चौकात महाराष्ट्र वाहतूक सेना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्यावतीने सह्यांची मोहिमेस प्रारंभ केला.प्रदूषण करणाऱ्या वाहनांमुळे वातावरणात कार्बन मोनोआॅक्साईड व कार्बन डायआॅक्साईड हे दोन विषारी वायू सोडले जातात. हे दोन वायू मानवी शरीरास घातक समजले जातात. त्यामुळे जागतिक तापमानातही वाढ होत आहे. त्यानुसार राज्यातील अशा प्रदूषण करणाऱ्या  वाहनामध्ये बी. एस. २ च्या रिक्षांचा समावेश यात करण्यात आला. त्यास अनुसरून राज्यात हा निर्णय घेण्यात आला. मात्र आपली जुनी रिक्षा स्क्रॅप करून नवीन रिक्षा खरेदी करणे सामान्य रिक्षा चालकांच्या आवाक्यांच्या बाहेर आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होऊन अनेक कुटूंबियांचा उदरनिर्वाहांचा प्रश्न निर्माण होणार आहे. हा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी ही सह्यांची मोहिम सुरु केली. सुमारे दहा हजार रिक्षा चालकांच्याकडून सह्या घेवून, यांची प्रत शासनाला पाठविण्यात येणार आहे.इतर वाहनेही याच नियमानुसार स्क्रॅप करा. ज्या रिक्षा स्क्रॅप करणार त्यांना नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव,महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्राकांत भोसले, दिनेश परमार, दिलीप सुर्यवंशी, वसंत पाटील, रमेश पोवार, धनाजी यादव, विनायक पत्रावळे, भारत पाटील, साहेबराव पोवार, राजू कापूसकर, धनाजी यादव आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर