या आंदोलनात शेकाप, भाकप, माकप, एआयएसएफ, आप, जनता दल, रेशन बचाव कृती समितीसह विविध २५ संघटना सहभागी झाल्या. त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला. नवीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत केंद्र सरकारशी लढा देण्याचा निर्धार आंदोलकांनी यावेळी केला. यावेळी माजी आमदार संपतराव पवार-पाटील, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, अतुल दिघे, गिरीश फोंडे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, उदय नारकर, बाबासाहेब देवकर, संदीप देसाई, वसंत पाटील, रवी जाधव, कुमार जाधव, आदींनी मनोगतातून केंद्र सरकारचा निषेध केला.
आंदोलनात शिवाजीराव परुळेकर, बी. के. शिंदे, टी. एस. पाटील, हसन देसाई, डी. एम. सूर्यवंशी, केरबा पाटील, राजेश वरक, सुनीता अमृतसागर, स्नेहल कांबळे, आनंदा मोरे, आरती रेडेकर, प्रशांत आंबी, आदी सहभागी होते. दरम्यान, या आंदोलनावेळी काही कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला. आंदोलक हे त्या पुतळ्याचे दहन करताना पोलिसांनी त्यांना रोखले. त्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली.
कोण, काय म्हणाले?
संपतराव पवार-पाटील : भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी केंद्र सरकारने हे नवीन कृषी विधेयक धोरण मंजूर केले आहे. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे.
चंद्रकांत यादव : शेतकरीविरोधी कायदे करून केंद्र सरकारने शेती आणि शेतकरी यांना धोक्यात आणले आहे.
नामदेव गावडे : दिल्लीतील आंदोलन हे केवळ पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांबरोबरच संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आहे.
अतुल दिघे : केंद्र सरकारने केलेल्या या कायद्यामुळे शेतकरी, ग्राहकांचे नुकसान होणार आहे.
फोटो (०४१२२०२०-कोल-डाव्या संघटना आंदोलन ०१, ०२) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसह शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात गुरुवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि विविध घटक, डाव्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
फोटो (०४१२२०२०-कोल-डाव्या संघटना आंदोलन ०३, ०४,०५) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसह शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात गुरुवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि विविध घटक, डाव्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.