शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहा लाखांहून अधिक बक्षिसे जिंकण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:33 IST

कोल्हापूर : रांगडी कुस्ती व फुटबॉलची परंपरा जपणाºया कोल्हापूरकरांसाठी ‘लोकमत’ समूहातर्फे प्रथमच यंदा दि. १८ फेबु्रवारीला ‘महामॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.‘रन फॉर मायसेल्फ’ अशी साद देत कोल्हापूरकरांसाठी आयोजित केलेल्या या महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉन व सर्वाधिक सहा लाखांहून अधिक बक्षिसांच्या स्पर्धेतील सहभागाबाबत नागरिक, ...

कोल्हापूर : रांगडी कुस्ती व फुटबॉलची परंपरा जपणाºया कोल्हापूरकरांसाठी ‘लोकमत’ समूहातर्फे प्रथमच यंदा दि. १८ फेबु्रवारीला ‘महामॅरेथॉन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे.‘रन फॉर मायसेल्फ’ अशी साद देत कोल्हापूरकरांसाठी आयोजित केलेल्या या महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉन व सर्वाधिक सहा लाखांहून अधिक बक्षिसांच्या स्पर्धेतील सहभागाबाबत नागरिक, धावपटू, खेळाडूंमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.औरंगाबाद आणि नाशिकमधील ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या प्रचंड यशानंतर आता कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच यावर्षी महामॅरेथॉन रंगणार आहे.ही मॅरेथॉन २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर पॉवर रन, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली रन अशा अंतरांची असणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.‘लोकमत’ने कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, क्रीडाप्रेमींसाठी या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोल्हापूरमधील शासकीय अधिकारी, नामवंत डॉक्टर्स, वकील, अभियंते, आदींनी या महामॅरेथॉन स्पर्धेत नोंदणी केली आहे.शर्यत वयोगट वर्गवारी प्रथम द्वितीय तृतीय२१ कि.मी १८ ते ४५ पुरुष (खुला) २५,००० २०,००० १५,००० रु१८ ते ४० महिला(खुला) २५,००० २०,००० १५,००० रु४५ (वरील) पुरुष (प्रौढ) २५,००० २०,००० १५,००० रु४० (वरील) महिला (प्रौढ) २५,००० २०,००० १५,००० रु१८ ते ४५ (वरील) पुरुष (परदेशी) २०,००० १५,०००१८ ते ४० (वरील) महिला (परदेशी) २०,००० १५,०००१८ ते ४५ पुरुष (खुला) १५,००० १२,००० १०,०००१८ ते ४० महिला (खुला) १५,००० १२,००० १०,०००४५ (वरील) पुरुष (प्रौढ गट) १५,००० १२,००० १०,०००१० कि.मी ४० (वरील) महिला (प्रौढ गट) १५,००० १२,००० १०,०००१८ ते ४५ (वरील) पुरुष (परदेशी ) १५,००० १०,०००१८ ते ४० (वरील) महिला (परदेशी ) १५,००० १०,०००डिफेन्स कप रन फॉर द कप पुरुष ( ल.दल,पो.) २५,००० २०,००० १५,०००रन फॉर द कप महिला (ल.दल,पो.) २५,००० २०,००० १५,०००सहभागासाठी येथे नोंदणी कराया महामॅरेथान स्पर्धेत सहभागासाठी नावनोंदणीला उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोल्हापूरकरच्या क्रीडाप्रेमींचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता ६६६. ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/‘ङ्म’ँंस्र४१ या वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९८८१८६७६००, ९६०४६४४४९४ वर नोंदणी करता येणार आहे. ३ फेबु्रवारीपर्यंत नावनोंदणीची संधी आहे.कोल्हापूरचा नकाशा चे ‘मेडल’या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या चार शहरांमधील मॅरेथॉन जिंकून ही मेडल्स पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.