शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नेमबाज अभिज्ञाला ऑलिम्पिक अतिरिक्त कोटयासाठी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:10 IST

कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन आपले मानांकन सुधारावे लागणार आहे.

ठळक मुद्देनेमबाज अभिज्ञाला ऑलिम्पिक अतिरिक्त कोटयासाठी संधीसहा महिन्यांत मानांकन सुधारावे लागणार

कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन आपले मानांकन सुधारावे लागणार आहे.टोकियो २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या २०२१ मध्ये टोकियो येथेच होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अभिज्ञाने तीन ऑलिम्पिक निवड सराव चाचणी दिलेल्या होत्या. या ऑलिम्पिक निवड चाचणीमध्ये अभिज्ञाने चांगल्या गुणांची कमाई केल्यामुळे भारतीय नेमबाजी निवड समितीने निवडलेल्या चार खेळाडूंच्या प्राथमिक संघामध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.

त्यामुळे अभिज्ञाला ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची संधी प्राप्त झाली आहे. तिला पुन्हा नवी दिल्ली येथे १ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सराव शिबिरासाठी पाचारण केले आहे. यापूर्वी या प्रकारात राही सरनोबत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. अभिज्ञाला ही संधी मिळाली तर ती तिसरी कोल्हापूरकर होईल.अभिज्ञा बालेवाडी क्रीडासंकुल येथे नेमबाजीचा सराव करीत होती. सध्या छत्रपती संभाजीराजे विभागीय क्रीडासंकुल, कोल्हापूर येथे ती सराव करीत आहे. ऑलिम्पियन नेमबाजी गगन नारंग, प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर साखरे, राही सरनोबत व आईवडिलांचे सहकार्य लाभत आहे.

ऑलिम्पिक पात्रतेची पुन्हा संधी मिळाली आहे. देशभरातील अनेक दिग्गजांमधून मिळालेल्या संधीचे सोने करीन.-अभिज्ञा पाटील, आंतरराष्ट्रीय नेमबाज

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020kolhapurकोल्हापूरShootingगोळीबार