शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जुन्या चेहऱ्यांना दिलेली संधी महाडिकांच्या पथ्यावर

By admin | Updated: April 22, 2015 00:28 IST

राजाराम कारखाना विजय : कोरेंची साथ असूनही सतेज पाटलांनी लढविला एकतर्फी किल्ला

रमेश पाटील - कसबा बावडाजुन्या सहकाऱ्यांना दिलेली संधी, हातकणंगले तालुक्यासह करवीरमध्ये मारलेली मुसंडी यामुळे राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांनी सलग पाचव्यांदा एकतर्फी विजय मिळाला. महाडिक यांची सत्ता हटविण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली. परंतु, त्यांना महाडिक यांचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले तालुक्याने हात दिला नाही.विधानसभेच्या निवडणुकीनंतर काहीकाळ राजकीय विजनवासात गेलेल्या माजी मंत्री सतेज पाटील यांनी निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कारखाना कार्यक्षेत्रातील गावोगावी भेटी देऊन सभासदांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न घेत निवडणुकीची तयारी सुरू केली. प्रचार सभांमध्ये सभासदांना ‘हीच वेळ आहे परिवर्तनाची.... आता नाही तर कधीच नाही...’, अशी ‘भावनिक’ साद घातली. या निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांचा सतेज पाटील पॅनेलला जरी पाठिंबा असला, तरी ते प्रचारात प्रत्यक्षात कोठेही दिसलेच नाहीत. त्यामुळे हातकणंगले तालुक्यात सतेज पाटील गटाला मुसंडी मारता आली नाही. त्यामुळे पाटील हे एकटेच मैदानात लढत राहिले. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनीही गावागावांत सभा घेऊन ‘परिवर्तन’ करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. मागील निवडणुकीत सतेज पाटील यांना विनय कोरे, हसन मुश्रीफ, निवेदिता माने यांची मदत झाली होती. या निवडणुकीत तसे चित्र दिसले नाही.आमदार महाडिक यांनी सुरुवातीला ही निवडणूक अगदी सहजपणे घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते नेहमी ‘राजाराम’ची निवडणूक ही एकतर्फी होणार असे म्हणत असतं. परंतु, जसजशी निवडणूक जवळ येईल, तसे महाडिक अधिक सावध झाले. पॅनेलची आखणी करताना बऱ्यापैकी ‘रोटेशन’ पद्धत अवलंबत संधी मिळालेल्या विद्यमानांपैकी काहींना थांबवत जुन्या सहकाऱ्यांना परत घेत पॅनेलपासून कोणी दुरावणार नाही, याची दक्षता घेतली. काहींना भविष्यात तुमच्याकडे पाहिले जाईल, असे आश्वासन देत विरोधी आघाडीस कोणी मिळणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली.जे येतील त्यांना बरोबर घेत सतेज पाटील यांनी आपली लढाई सुरूच ठेवली. त्यांना करवीर, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत चांगली साथ मिळाली. दक्षिण मतदारसंघातील काही गावांतही त्यांना चांगली मते मिळाली. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यानेही त्यांना चांगली साथ दिली. याउलट महाडिकांनी करवीरमधील अनेक मोठ्या गावात मुसंडी मारत चांगले मताधिक्य घेत सत्ता ताब्यात ठेवली. प्रचाराच्या होत असलेल्या आरोपाने ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट ‘राजाराम’वर आपलीच सत्ता येणार, असे ते नेहमीच ठणकावून सांगायचे आणि घडलेही अगदी तसेच.या निवडणुकीतील दोन्ही पॅनेलला मिळालेल्या मतांचे आकडे पाहिले, तर १०० ते ३०० मतांच्या फरकाने महाडिक यांच्या पॅनेलने जागा जिंकल्या आहेत. जर निवडणूक एकतर्फी होती, असे महाडिक नेहमी म्हणत असले, तरी त्यांचे उमेदवार इतक्या कमी मताने कसे विजयी झाले? याचे आत्मचिंतन महाडिक यांना आता करावेच लागणार आहे. विजयानंतर आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते निवडणूक प्रचारात सभासदांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे. वेळेत उसाची तोड व्हावी आणि सरासरी इतर पाच कारखान्यांपेक्षा जादा दर मिळावा, एवढीच सभासदांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. वर्षभरात महाडिकांना सलग चौथ्यांदा यश मिळाले आहे.